आगरी कथा

*आगरी भाषेत लिहिली गेलेली आजवरची सर्वात विनोदी स्टोरी. वाचताना हसून हसून नाही लोटपोट झालात, तर कायपण हरायला तयार! आगरी नसाल तरीपण भावना समजुन आनंद घ्याल…*.😁😁😁😁😁

*लॉक डाउन , पोलीस आणि मी ….*

चंदऱ्याचा फोन अला तसा मिनी लगेच नाक्याव जायाची तयारी केली .. तशी आमची डोकरी बाेलली ” बाला कया
जातंस .. ”
” नाक्याव जरा जाऊनशा येताव..घरांन बसून कटाला आयले.. ”
तवऱ्यान आमचे बायकोनी पन कटकट लावलीच ” अशे टायमाला बाहेर निंघाची काय गराज हाय..?? बाहेर वातावरण क ह तुमाला तवरा पन नाय समजत ..”
” अगो पंदरा दिस झले .. घरान कोंबऱ्यासारखा बसल्याव .. जरा हवा पालट करून फ्रेश होऊन येताव .. उगाच फालतू कईपन जापु (बोलू ) नको ..”
बिचारी .. मी असा बोलल्याव काय बोलनार ..? खरा सांगू .. मना पन लय कटाला आलता ये लोकडाउनचा .. सकालचे उठाचा , कईपन खावाचा , टीवी बघाचा , दुपारचे जेवाचा , झोपाचा , संचे उठाचा थोरा टाईमपास कराचा , डोकरीचे न कलत दोन पेग माराचे जेवाचा ना वापस झोपाचा .. ईच्याभना ही काय जिंदगी हं..?? ना त्यान सगल्यांच्या साईटी पन बंद ..😞😞 म्हगुण चंदऱ्याचा कॉल आल्याव लगेच निंघलो .. राजा ना सुन्या भट पन येणार होते.. माल झेऊन …🍾🍾😜😜

पूल उतरून बिर्यानी कॉर्नर .. त्याचे बाजूला आमच्या अण्णाची चायची टपरी .. आमचा नाका .. गावातली सगली चांडाल पोरं तिथं कायम परलेली .. बाईक ला किक मारली ना शिधा नाक्याव .. रस्त्याव कुणीच नव्हता .. मधीनच दोन चार बापे हातानं भाजीच्या पिशव्या झेऊन दिसाचे .. चंदऱ्या , राजा , सुन्या भट आधीच आलते .. मना बघल्याव पुडी काढली ना मळून प्रसाद सगल्यांना दिला ..बरेच दिसांशी भ्याटल्यामुले हसी मजाक ला उधाण आलता .. सुन्या भटाची कॉमेट्री सुरू झाली .. त्याची बोली म्हणजे निसती कॉमेडी ..पन साला नावालाच भट ..बामन आई बापास चे पोटी जलमाला आला म्हगुण बामन .. बाकी सगला झिंगाट …🍾🍾🐓🐓… तर सुन्या भटाची कॉमेट्री चालू होती ना आम्ही टाळ्या व टाळ्या देत होतो …. तवऱ्यान आमचे समाेर जीप उभी रायली ना तिच्यातून धपाधप सात आठ पोलीसाई धावतच उऱ्या टाकल्या … ना मंग के ..निस्ता धर आपट धर आपट …👊👊🤜🤛😲😲
राजाला तर लगेच गुलामा सारखा बरवायला सुरवात केली .. तो ढोरा सारखा ओरडत होता … चंदऱ्या ला तर टपरी च्या टेबलाव उताणा करून ठोकत होते ..च्यानस बघूनशी मी साईडशी कलटी मारून बाईक जवल धावतच निंगलो तशी एक पोलिसानी तवऱ्या लांबशी काठी माझे पायांचे मधीन फेकून मारली ना मी गचाललो … जमिनीव उताणा परलो .. त्याचे जोरीला दुसरा राकोस ( राक्षस ) पिन आला ना मग जी काय बरवायला सुरू झली .. इचरूच नका .. त्यांनी ठोकायचा ना मी बोंबलाचा .. कंबरेच्या खालशी एक कल निंघाली डायरेक डोक्यांन ..
सुन्या भटानी चापलूशी करून त्यांचे तावरीतुन निसटण्याची भारी आयडया केली … त्यानं तो सक्सीस पन झला …पाठी बघूनशा पुढं पलताना एका दगरीवर तो ठोकरला … तो पन रस्त्याव उताना .. खिशान लपवलेली कॉटर ( बाटली ) रस्त्याव परली ना फुटली .. 😭😭 तसा सुन्या भटाचा नशीब पन फुटला .. मना ठोकणाऱ्या पोलिसांनी मना टँम्प्लिज दिली ना सुन्याच्या अंगाव बॅटिंग करायला सुरुवात केली …
तीच गोल्डन चानस बघून बाईकवर टांग मारली … किक मरताव .. मरताव .. पन बसंती चालूच होत नाय …( नंतर समजला चावी लावलीच नवती 😁😁) मना किक मारताना बघल्याव एक पोलीस माझ्याक धावत यायला निंघाला … आधीच मी घामाघूम .. त्याला धावताना बघल्याव अजूक घाम फुटला …. शीर सलामत तो बाईक पचास … शालेन शिकलेलो … बाईकचा नाद सोरला ना कुल्याला पाय लावून धावाला सुरवात केली ..
धावतो … पडतो … परत उठून धावतो …तशान एक रिक्षा बाजूला थांबली .. मना आत लोटला … डायवर चा खाकी शर्ट बघून घसा कोरडा … दुसऱ्या साईडशी मी परत बाहेर पळालो … डायवर माझे मांगे ” ओ शेठ .. ओ शेठ मी तुमचा भाडोत्री “… तवा जीव भांड्यांन परला …मग रिक्षांन बसून की झोपून मना आठवत नाय… कसातरी आमचे घराजवल आलो …डायवरला बोललो कोनाला कयपण सांगाचा नाय …
पन आमचे आधीच आम्ही खाल्लेली मातीची बातमी सगल्या आेलीत पोचली होती … सगली माणसा , बाया , पोरंटोरं त्यांचे दरवाजान उभी …
रिक्षांशी आंगण्यात उतरताच माझी परिस्थिती कवरी सिरीयस हाय तेचा अंदाज अला … पावाचे बनपाव झाले होते … वाट्यांचे करवंट्या झाल्या होत्या …
बदकासारखा चालत चालत मी घराच्या दरवाज्याजवल पोचलो … कुणीतरी टेपरेकॉर्डर वर जोरान कव्वाली लावली होती … *कल जो तनके चलते थे , अपनी शानो शौकत पर , शम्मा तक नही जलती आज अपनी तूरबत पर ..चढता सुरज धिरे धिरे* … मना समजला मनाच चिरवाला त्यांनी ती कव्वाली लावली होती …🤨🤨
ठीक ह …तुझा हिशोब नंतर करीनच …फक्त सूज उतरू दे ..😡😡 ओटी वर गेल्याव लगेच पलगावर आडवा झलो ..
डोला लागला नय लागला तोच समोरची बारकी बाय ना जन्या भावजी मना बघाला आलं … मी उघराबंब , पालथा ,
लुंगीवर …. बाय चे डोळ्यांन पानी .. मुसमुस करून लराला लागली त तिला बघून बायको पन जोरानं लराला लागली….
डोकरी पन …😭😭
मना वाटला त्यांना सांगावा आरं बाबा मी हाव अजून जिता … बायचा बारका पोरगा पन जाम आवली …. माझी काली निली लाल झालेली पाठन बघून तिला इचरित होता ” मामा रंगपंचमी शालाला ( खेळायला ) कुठं जेलता ..?? आरं पादऱ्या भाच्या तुला आता क बोलू ..? नंतर थोडे टायमानी ओळखीचे लोकांची मना भ्याटाला घरा यायला सुरुवात झली … मास्क लावून आल्यामुले ओळखाला नीट जमत नव्हता … काहीजन ओटीव त काहीजन बाहेरच्या पडवीन बसाचे …

जो तो येऊन बसाचा …स्टोरी इचराचा … पाठनाला हात लावून बघाचा .. चाय पिऊन झाल्याव निघताना वापस बाहेर जाऊ नको हो .. असा सल्ला न इसरता देत होते …. काहीजन तर माझे रंगवलेल्या पाठीचा ना कु …च्या सोबत सेल्फी पन घेत होते …😡😡
मागचे पडवीन बायांबरोबर लरून लरून बायकोचे डोले सुजले होते … डोकरीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता … कोनी आला की नुसती ओटी वर येऊन पोलिसांना शिवा देत रवाची …. आळीतल्या टवाळ पोरांनी माझे 5 वर्षाचे लेकाला चांगलाच शिकवून ठेवला होता …. बाहेरशी शिटी वाजली का यो घोषना देयाचा …. *पिटेगा* *इंडिया तभी तो घर मे टिकेगा* *इंडिया* …
आख्ख्या ओटी वर टाळ्या पिटत घोषणा सुरू … असा राग यायचा … पन क करणार आपन शेन खालता ना … हललो त आंग ठणकाचा ….आख्या अंगाव पोलिसाइ टॅटू छापलं होतं … रातचे डोकरी माझे अंगाला आंबंहलद लावताना बोलली ” पोरा तुला संगला होता … नको जाव तिकरं….ऐकला असता त ” … तिचे डोळ्यांन पानी बघून मना पन खराब वाटला …खरंच आपली चुकी झली ….आपुन घरात बसलो असतो तर ही पाली आली नसती …
म्हगुण मित्रांनो तुमा सगल्याना हात जोरून विनंती करताव 🙏🏻🙏🏻.. कुनी बाहेर पडू नका … कोरोना डेंजर हाय .. ना त्यापेक्षा डेंजर आपले पोलीस हाय … ते आपले साठी बाहेर ड्युटी व असतान …त्यांचे घरच्या लोकांना साेरून … कोरोना पावलापावलावर त्यांचे जवल फिरत असून पन ते आपल्या साठी उनान नाेकरी करतात…मित्रमंडली , नाका , मजा मस्ती आयुष्यभर करायचीच हाय … पन ते साठी आपन जगलो तरी पायजे का नको ..?? बघा तुमाला पटत असेल त ठीक …. नायतर चौकात जाऊन फ्रेश होऊन या .. खोटा वाटत असेल तर आमचे राजा , चंदऱ्या नायतर सुन्या भटाला इचारा …..
आनी हो अजून एक … जर गेलात नाक्याव तर माझी बाईक पन झेऊन या ….

स्वामी

3 प्रतिक्रिया