कँरट सूप
साहित्य: अर्धा किलो गाजरे, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 बटाटा, थोडी कोथिंबीर, 1 तमालपत्र, 2 लवंगा, 1टेबलस्पून लोणी
गाजर, बटाटा, टोमॅटो पाणी घालून उकडा. मिक्सरमधे वाटून घ्या. लोण्यावर तमालपत्र व लवंगा टाका. चिरलेला कांदा परता. त्यात गाजराचा लगदा घाला. पाणी , साखर, मिठ व कोथिंबीर घाला आणि लगेच गरम गरम प्या.