इन्स्टंट कलाकंद

इन्स्टंट कलाकंद
साहित्य : पनीर २०० ग्राम, फ्रेश क्रीम २५० मी. ली., मिल्क पावडर १ कप, साखर १/२ कप, वेलचीपूड १ १/२ टिस्पून, दुधा मध्ये घोळवलेला केसर, थोडेसे तूप, उभे चिरलेले पिस्ते.
कृती : एक भांड्या मध्ये पनीर कुस्करुन घ्यावे व त्यात फ्रेश क्रीम, मिल्क पावडर, साखर व केसर घालून मंद आचेवर गरम करावे, मिश्रण गरम करत असताना त्याला सतत ढवळावे, मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पूड घालावी. एका डब्याला तूप लावून घ्यावे आणि त्यात मिश्रण घालावे व वरुन पिस्ते टाकावेत. कलाकंद तयार.