*आई – बाप*
आई -बापाची रे माया,
कधी संपणार नाही,
त्यांचं गुण किती गाऊ..
त्याला जगी तोड नाही…।।धृ।।
आई प्रेमाची सरिता,
बाप दयेचा सागर..
आई अमृताची गोडी,
बाप दूध नि साखर…
आई – बापाची पुण्याई जगी
संपणार नाही..।। 1।।
आई ममतेची खाण,
बाप वात्सल्याचे वाण…
आई रोपट्याचं बीज,
बाप वृक्षसावली ती..
आई – बापाची रे छाया
सदा लेकरावर राही..।। 2।।
आई मायेचा पाझर,
बाप प्रेमाचा घागर…
आई पहिलाच गुरु,
बाप त्याचा कल्पतरू
आई -बापाचं उपकार कधी
फिटणार नाही…।। 3।।
आई पिकाचं मोहर,
बाप धान्यांचं कोठार..
आई धरतीची जाण,
बाप आकाशाचं वाण..
अशी संगतीची प्रीती
जन्मोजन्मी चालत राही..।। 4।।
आई काळजाचा ठाव,
बाप हृदयाची रे धाव..
आई संसाराची नाळ,
बाप घराचा रे आधार..
आई-बापा विना काही
या जगी येणं नाही..।। 5।।