गर्जतो आम्ही मराठी….।।
मराठी आमची भाषा, आम्ही सारे मराठी,
मराठी आमचा बाणा, भाग्य आमचे मराठी …
मानतो आम्ही मराठी, जानतो आम्ही मराठी,
मर्द हो आम्ही मराठी, गर्जतो आम्ही मराठी….।।
शिवरायाची छाती असे ही, बलिदानाची माती,
संतांची ही पावन भूमी, शुरवीरांची क्रांती..
आमची माय मराठी ही, आमची माय मराठी,
बोलतो आम्ही मराठी, स्मरतो आम्ही मराठी…
मर्द हो आम्ही मराठी, गर्जतो आम्ही मराठी….।।1।।
महाराष्ट्राची शान आणि हा, महाराष्ट्राचा मान,
संस्कृतीची जान खरी, हा आमचा रे अभिमान..
आमची माय मराठी ही, आमची माय मराठी,
गातो आम्ही मराठी, ध्यासतो आम्ही मराठी..
मर्द हो आम्ही मराठी, गर्जतो आम्ही मराठी….।।2।।
विश्वाच्या बालकिल्ल्यावर, भगवा झेंडा मराठी,
इतिहासाच्या पानावर, गाजते ही मराठी…
ध्यास हा आमचा मराठी, श्वास रे आमचा मराठी,
हृदयात आमच्या मराठी, मनात आमच्या मराठी…
मर्द हो आम्ही मराठी, गर्जतो आम्ही मराठी….।।3।।
छान✊