क्षणात जीवन सारे…..
नसे चींता मज मागची
नसे कुतुहलता मज पुढची
मी आहे रमलेले या क्षणात.
क्षणात जगण्याची मज्जा
भिती कसली तुला रे
नको करू तू विचार
येणार्या आगतुक क्षणाची.
घे आनंद या क्षणाचा
जीथ फक्त तू अन तो क्षण
हरवसी जर तु हा क्षण
गमवसी तु आनंद क्षणातला
क्षण क्षण लावी हुरहुर
गेलेल्या त्या क्षणाचा
न मिळे परतोनी तो क्षण
त्या क्षणात आनंद आहे….