सहनशक्ती

सहनशक्ती
सहन करणं आता अंगवळणी पडतंय….
सगळ सहन करण्यापलीकडचं
पण सहन करायलाच हवं
बोट धरणाऱ्यांनी हात दाखवले
तरी सहन करायलाच हवं
ज्यांच्या साठी घरावर छत निर्माण केलं
त्यांनी अनाथाश्रमाचं छत दाखवलं
लाचार म्हणून आलेलेच, शिष्टाचार शिकवतात
अनाथ केंव्हा झाले नाथ, कळलेच नाही
अत्याचार करणारे तरी करतात काय?
सहनकरणाऱ्यांची जमातच निर्माण करतात
जुलूम करणारे आहेत म्हणून सहन करणारे आहेत
बंड केलं की अस्तित्वच संपवलं जातं
सहन करणं आता राजरोस झालं आहे
सहन नाही झालं की अंधश्रद्धा,
आत्महत्या तयारच असतें
सहन करण्याशिवाय सामान्यांच्या
हातात दुसरं आहे तरी काय?

मन

वडील..

लपा-छपी

मन