शहर( एक कविता)

शहर (कविता)

नुसतच उंचच उंच इमारतींनी भरलं आहे शहर
तितकच माणूसकीनी शून्य झालं आहे शहर।

शहरातले रस्ते रुंदच रुंद होत आहे
फुटपाथवर मात्र शहराची गरिबी दिसत आहे।

पैसाच पैसा वाहतो आहे शहराचा विकास होतो आहे
कुणाचे तरी रक्त कुणाचा घाम या पैशात झिरपत आहे।

एक एक गाव सामावत शहराच्या सीमा वाढत आहे
गावकरी शहराच्या विकासासाठी आपल्या जमिनी विकत आहे।

जमिनीच्या पैशात गावकरी शहरात गाडी-बंगला घेत आहे
शहरातली माणसं मनःशांतीच्या शोधात गावोगाव भटकत आहे।

कष्टकरी जनता रोजगारासाठी धडपडत आहे
सरकारी रोजगार योजनांनी फक्त भ्रष्टाचार फोफावत आहे।

गरीब शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक फासावर लटकत आहे
आणि ह्या आत्महत्यांचे भावनिक भांडवल करुन नेते पुन्हा आपली ‘वोटबँक’ वाढवत आहे।

नुसतच उंचच उंच इमारतींनी भरलं आहे शहर
तितकच माणूसकीनी शून्य झालं आहे शहर।

लपा-छपी

मन