कविता
चांदण्या
चांदण्यांनी वळुन पाहीले चंद्राला
चंद्राने हसुन विचारले चांदण्यांना
रोज विहार करता माझ्या संगे
तुम्ही रोज बघता चंद्रकला…..
आकाशीचे राजे आपण
आपल्या संगे सूर्य साजण
सूर्य एकटा फिरतो पण
माझ्या भोवती चांदण्यांचे कोंदण…..
सूर्याची गती एकच पण
माझ्या नाना तर्हा
सागराची भरती व ओहोटी
माझ्यावरच ठरतात तिथीच्या कला….
दिवस भराची उष्णता सूर्य देऊन जातो
बघा चांदण्यांनो रात्री गारवा सुंदर गातो
तुमचे आणि माझे नाते युगायुगाचे
धरतीवर झाली शुभ्रतेची दाटी
अंजली देशपांडे