मृत्यू पाहिलेला माणूस
हो मीच आहे मृत्यू पाहिलेला माणूस
माणसे रोज कितीदा तरी मरतात
आणि प्रत्येक मरणातून
नवीन काहीतरी शिकतात
विषाणूने दाखवलेलं मरण मी पाहून आलो
विषाणूला सांगितले अजून मला जगायचंय
अजून मला भरपूर लिहायचंय, वाचायचंय
अजून मला पहायचंय मनांच सौंदर्य
मला ऐकायचंय निसर्गाचे संगीत
अजून मला संवाद साधायचा आहे
आपल्या मनांशी, आपल्या माणसांशी
ओठापर्यंत आलेलं व्यक्त करायचं आहे
असामान्यांचे नाही सामान्यांचे
तरी जीवन जगू दे
जाणिवेतलं नेणिवेत जगायचे आहे.
डॉ.अनिल कुलकर्णी