वाली!

शुकशुकाट सगळीकडे
ओसाड सारा गाव
काय खरे काय खोटे
उगीच मनात भीती दाटे
एकलकोंडी किती रहावे
मनी पसरले विषण्ण काटे
नातीगोती संपतच होती
कोरोना ने अजून फुटले फाटे
किती एकाकी कोंडून घेऊ
घर खायला उठले
महामारीचा धसका कुठवर घेऊ
विचारच सारे खुंटले,
परिणाम याचे काय होतील
पहायला राहू आपण सर्व
माणुसकी जपायची
निसर्ग सारा आपुला वाली
त्याची ‘किंमत’ करायची

लपा-छपी

मन