वाढता वाढता वाढे
लाॅकडाउन चे पाढे
कोरोना सोबत लढे
जीवाची चिंता रोजच पडे
वाढणारे रोग्यांचे आकडे
सरणावर मिळेनात लाकडे
थकलेले घराचे भाडे
कर्ज ही नसे थोडे
वरातीमागुन आलेले घोडे
सरकार नेते नुसतेच बोलघेवडे
निराश मनाने घरीच पडे
पोटाच्या खळगीत भरावेत का खडे?
रोगाचे भांडवल सोयीनुसार
निवडणूक पाहून रोग ही पसार
आता पुरते मोडले आहे कंबरडे
कधी उकलणार हे लाॅकडाउन चे कोडे