वडील..

वडील.
पडद्यामागचा सुत्रधार
पडद्यासमोर कधीही
न येणारा वडील
प्रेमाशिवाय कोणतेच
डील न करणारा वडील
गेल्यावर जास्त फील
होतो तो वडील
नावालाच कर्ता पुरुष
तरीही कुटुंबाला ठेवतो खूष
बैलाच्या पोळ्या प्रमाणे
एका दिवसाचा उत्सवमूर्ती
नटसम्राट असला तरी
चपला झिजवणारा चितळे मास्तर
आईची कविता प्रेम स्वरुप
वडिलांची कविता ग्रेसफुल.
डॉ.अनिल कुलकर्णी.

मन

वडील..

लपा-छपी

मन