मन.
मन गहिवरायलां दुःख कशाला पाहिजे?
मन शहारून जायला सुख कशाला पाहिजे?
मन एक अलीप्त संप्रेरक
मनाला औषध नसतं
मन औषध शरीराचं
मन आयुध शरीर शिल्प कोरणारं
किंवा शरीर शिळा दुभंगवणारं
मनातली वादळे न दिसणारी
शरीर जेव्हा आपलं नसतं
तेंव्हा मनाचं असतं
मन जेव्हा आपलं नसतं
तेव्हा शरीराचंअसतं
मनाच्या रिक्टर स्केलची नोंद
शरीराला घ्यावीचलागते
मनाच्या भिंतीला आता
रंगवायची गरज नाही
कल्पनेचे वॉलपेपर चालतात
मना शिवाय पान हालत नाही
मन क्षणांना जन्म देणारं दवबिंदू
डॉ.अनिल कुलकर्णी.