झालाय जगाचा कायापालट, मलाही बदलायला हवं
झटकून सारी मरगळ, धारण करावं रूप नवं,
वर्ष वर्ष सरत चालली, वय ही वाढु लागलं
जीवनाचं ध्येय काय❓, अजुन नाही सापडलं,
स्पर्धेच्या युगात या, हरवल्यात सार्या वाटा
पाण्याचा थेंब मी, प्रतिस्पर्धी जणु समुद्राच्या लाटा,
वेग पाहून प्रवाहाचा, मार्ग मी नाही बदलणार,
ध्येय माझे तो शिंपला, त्यात सामावून मोती होऊन चमकणार.