आटलंय डोळ्यांतील पाणी मी रडू कसा?
वाढलेल्या नदीच्या पाण्याला, बांध घालू कसा?
पुराच्या पाण्यात बुडाला गाव, घराकडे जावू कसा,
जगण्याची उमेदच मेलीय, मी जगू कसा?
शेतातील पीकं आडवी झाली,
जनावरेही मेली, काही वाचली,
धन्याच्या लेकरांसोबत ती ही रडू लागली,
मायबाप, भर पावसांत करपलंय हे रान,
जनावरांना चारा आणू कसा?
सुखाचा घास हिरावला या पूरानं,
माझ्या गरीबीची लक्तरे अजून उंच नेलीत,
दु:खाच्या या डोंगरासमोर पार खचून गेलोय,
‘कणा’ ही मोडला या ओझ्याने, मी लढू कसा?
ओसरू द्या एकदा या पुराला,
त्यो देव महाराज माझ्या कष्टाचा पूर पाहील,
पाठीवर हात ठेवून लढायचं बळ ही देईल,
जीवनाच्या या चक्राला चुकवू तरी कसा?
छान लिहिले आहे
खूपच वास्तवदर्शी कविता, गेल्यावर्षी कोल्हापूरला हीच परिस्थिती झाली होती.