आणि संकटात सापडला आहे आपला “मराठी भाऊ”,
केलेल्या मदतीचा तुम्ही किती करता बाऊ, “एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ”, म्हणे तुकाराम,
संकटसमयी ‘भाऊ’ का दुरूनच राम राम,
मदत नाहीत करत; ‘साहेब’ असेही नाही,
आपल्या मदतीने संकटांचे डोंगर ही मागे सरलेत,
गरीबांचा आधारवड वटवृक्ष आपण,
त्याच्या छायेत किती तरी उभे राहिलेत,
मुंबई पुण्याच्या कंपन्यांतून आपला माणूस ‘गायब’ होतोय,
गजबजलेल्या भाऊगर्दीत तो एकटाच मार्ग शोधतोय,
“परप्रांतीयांचे” लाॅट इथे रोज धडकतात,
‘लाॅट’ मधील मग सर्वांनाच आवडतात,
कष्टाचे घास ‘भाऊ’ ही अन् ते ही खातात,
परंतु त्यांच्या कष्टांचेच गोडवे खुपजण गातात,
त्यांच्या बद्दल नेहमी सहानुभूती दाखवतात
काही आपल्या मुलांना कामावर ठेवायचेच टाळतात,
दहा दिवस गणपतीच्या सुट्टीला मुलाखतीतच आडकाठी,
‘छठ, दसर्याची’ त्यांना महिनाभर सुट्टी,
अन्यायाविरुद्ध काही विचारले तर ती मराठींची मुजोरी,
लांडग्यांच्या रुपात गायीचे कातडे पांघरूण त्यांची मात्र शिरजोरी.
मराठी कामगारांना अनेकजण नाक मुरडतात,
जबाबदारीचे काम मग यांच्यावरच सोपावतात,
इमानदारी मराठी ‘भाऊच्या’ रक्तात आहे,
संकटातून उभारण्याला ‘तुमचा’ हात हवा आहे🙏
कविता वस्तुस्थिती दर्शवणारीच आहे. पण आपणही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. त्या संघटना, त्या युनियन, ते बंद ते राजकारण यातच आपण अडकून पडतोय. मॅनेजमेंटला याचा त्रास होतो. काही ठिकाणी मराठी म्हणून डावलले जात असेल तर ते निश्चितच चुकीचे आहे. पण आपल्या चुकाही आपण टाळायला हव्यात.