सुखाची छत्री

दुःखाच्या पावसात
नाही मज भिजायचे,

आनंदाच्या कपड्यांना
नाही ओले करायचे,

संकटांच्या वादळात
हवाय पक्का निवारा,

मनाच्या घालमेलीचा
सावराचाय पसारा,

जीवनातील ‘कष्टांच्या’ उन्हात
चटके नकोत अंगाला,

हे नशिबाची सटवाई देवी
थोडी “सुखाची छत्री” ठेव माझे डोईला