आगीच्या धुरा मध्ये गुदमरला श्वास नवा,
सरकारी दवाखान्यात ‘कधीतरी’ बदल हवा,
दहा नवजात जग हे सोडून गेले
ढिसाळ सारी यंत्रणा त्यांनी हे दाखवून दिले,
बाप धावत होता जन्माच्या दाखल्यासाठी,
बाळ कधीच पोहोचले होते मरणाच्या काठी,
आमची यंत्रणा इतकी आहे महान की,
सटवाई देवी नशीब न लिहीताच परतली,
दहा चिमुकल्यांच्या जीवन प्रवासाची कहाणी,
सरकारी दवाखान्याच्या खोलीतच पुसटली,
निरागस जीवांनी देवाला विचारले,
सरकारी सुविधा कधी होतील ‘पंचतारांकित’?
‘देव’ ही निरुत्तर झाले, बोलले
निष्फळ आहे याबद्दल चे ‘भाकित’