No Lockdown

घरातील रेशन सारे गेले आहे संपून,
घरातील रेशन सारे गेले आहे संपून,
घरातील रेशन सारे गेले आहे संपून,
उघड लाॅकडाऊन आता उघड लाॅकडाऊन,

कोरोना मुळे आहे भिती मरणाची,
काय खावे आम्ही, चिंता जगण्याची,
खिशातील पैसे सारे गेले आहेत संपून,
उघड लाॅकडाऊन आता उघड लाॅकडाऊन,

श्वास घेण्यासाठी लागत आहे धाप,
किती केले काही तरी स्वतः तुला जप,
सरकारने कोरोना चे खापर दिले आम्हावर थोपून,
उघड लाॅकडाऊन आता उघड लाॅकडाऊन,

सरकारी नोकरांना लाॅकडाऊनचा काही फरक नाही,
पगार वेळेवर त्यांचा, आम्ही माणसेच नाही,
उंदीर मांजराचा खेळ तुमचा, घेतला आहे पाहून,
उघड लाॅकडाऊन आता उघड लाॅकडाऊन,

घाबरलेला माणूस सारा, नाही कोणी वाली,
न्युज वाल्यांनी प्रबोधनाऐवजी भितीच दाखवली,
हाॅस्पिटल मध्ये कुठे शिल्लक बेड द्यावा कुणी शोधून,
उघड लाॅकडाऊन आता उघड लाॅकडाऊन,

कोरोना बद्दल चे नियम सारे आहेत आम्हांस मान्य,
कोरोनावर उपचार करणारे डाॅक्टर आहेत धन्य,
श्वास म्हणजे जीवन, त्यास हवाय आॅक्सिजन,
कोरोना पासून वाचव देवा आता तुच येरे धावून।

( गीत- उघड दार देवा आता) श्री जगदीश खेबुडकर सरांच्या अजरामर पंक्तीतुन वरील काही ओळी सुचल्या