किरणे आशेची..

किरणें आशेची.
सुरज की किरणें रोज आती रहे ,जाती रहे.
साथ लायें रोज किरणोंका मेला.
किरणें तीच, सूर्यांचा जत्था तोच.प्रत्येक वेळेस किरणांचअस्तित्व वेगळं,
सकाळची कोवळीं किरणें, दुपारी प्रखर,सायंकाळी शीतल होतात.रात्रीअस्तित्वहीन. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर अंधाराचे जाळें येतच असतं, पणआकाश कधीतरी मोकळं होतंच. काळरात्र संपून उष:काल येतोच. फक्त थोडा धीर धरायला हवां, ज्यांनी धीर धरला ते आयुष्य जगले.
अंधांना सौंदर्य कसं जाणवत असेल? डोळस माणसांना उष:काल तरी आहे.सौंदर्य खरं मनात असेल तरच जग सुंदर भासत कां?
चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा संसर्ग लागला की भवतांल बदलतं आणि भवताल बदलले की सृष्टी बदलते, सृष्टी बदलली की दृष्टी बदलते.
प्रत्येक क्षणाक्षणाला किरणं तीच, जीवन वेगवेगळ भासतं. सूर्य फुलाला सूर्याभोवती फिरण्याची आवड इतकी की सूर्यफुल दिवसभर त्याच्या कडेच पहात राहत. कोवळी कीरणे खरीच कोवळ्या मनासारखी असतात.
सकाळची किरणे आशेची असतात. स्वप्न साकारणारे असतात. आशा घेऊन येणारी असतात. दिवसाची सुरुवात चांगली झाली असे उगीचच नाही कुणी म्हणत.
किरणांनी मानवी आयुष्य फुलविले तसेच अनेक फुलांना फुलविले. आणि फुलांनी जगण्याचे नवीन नवीन संदर्भ दिले. फुलांनी किती बहरावं मोहराव, स्वतः विकसित व्हावं हे शिकविले. चाफा बोलेना असं म्हटलं गेलं, पण चााफाआपल्यासौंदर्याने व विविध रंगाने बोलायला भाग पाडतोच, काव्य करायला भाग पाडतो. फुलांनी मानवी आयुष्य टवटवीत केले.फुलाला माहित असतं, आपलं निर्माल्य होणार आहे, देवाच्या चरणी किंवा स्त्रीच्या सौंदर्य वृद्धीसाठी किंवा माणसाचं मन मोहक करण्यासाठी. जेवढं अस्तित्व आहे, ते भवतांल मोहित करण्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येक फुलांनी एक सुंदर विचार दिला आहे. फुलावर असंख्य गाणी आहेत ज्यांनी मानवी जीवन समृद्ध केलं आहे. किरणें आहेत म्हणूननिसर्ग आहे, निसर्ग आहे म्हणून हिरवे हिरवे गार गालिचे आहेत. अनेकांना जे सुचले त्याचे उगमस्थान किरणेंच आहेत. किरणांनी निसर्ग घडविला, फुलविला.
जीवन देण्याची किमया त्यांच्यात आहे दुष्काळ घडवण्याची क्षमता आहे. पाऊस पडून धरतीला पैठणी नेसवणारी किमया किरणांचीच. बीजातून अंकुर उगवतो तो किरणा मुळेच. किरणें केवळ आशेची किरणेंच देत नाही तर जीवन देतात. किरणांनी किती वनस्पतींना फुलवले, किती माणसांना फुलंवलय, त्यांचं आयुष्य फुलवलंय.
प्रत्येक फुलावर मानवाने गाणं लिहिलय. मग ते चाफा बोलेना, फुल तुम्हे भेजा है खत मे फूल नही मेरा दिल है, बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया है,अजून का त्या झुडपा खाली सदाफुली असो, फुलांनी मानवी जीवन समृद्ध केलंय. फुलांकडे पाहिल्यावर असं वाटतं जीवनात ही घडी अशीच राहू दे. फुलाला निर्माल्य तसं माणसांना मृत्यू असतो. म्हणून जेवढं आयुष्य फुलंल आहे तेवढं समाधान मानून आठवणींचा सुगंध दरवळत ठेवणं आपल्या हाती आहे. तसंच माणसांनी सुद्धा जितके दिवस आपण आहोत तितके दिवस स्वतः स्वतःतून व इतरांना उमल ण्यास मदत करावी, यातच जीवनाचे सार्थक आहे.
रोजचं रटाळ, नैराश्य, दुःखाने भरलेले जीवन प्रत्येकालाच जगाव लागतं. तत्त्वज्ञान ते कसं जगावं ते सांगतं. कला ते कां जगावयाचे याचे उत्तर देते. निसर्गाने आपण मोहरून जावे तसेच या निसर्गाचं असतं. निसर्ग आपल्याशी बोलायला लागला, आपण त्याच्याशी संवाद साधला की, आपण केवळ प्राणी न राहता मनुष्यप्राणी होतो. आपल्या भावनांचा आदान-प्रदान निसर्गाशी करतो. निसर्गा वर काव्य करतो. प्राणी पातळी ओलांडून आपण मनुष्य म्हणून जगायला पात्र होतो. जीवनातल्या अवघड गोष्टी सोप्या करण्याची किमया निसर्गात असते. आपण निसर्गाला अवघड करून बसलो आहोत, उध्वस्त करत आहोत. आता निसर्ग आपल्याला आपली जीवन शैली बदलायला भाग पाडत आहे. निसर्ग हाच गुरु आहे हे पटायला लागतं. तू जो मेरे मनसे सूर मिला ले तो ये जिंदगी हो जाये सफल. आपण संवाद साधत नाही माणसाशी, निसर्गाशी,स्वतःशी नाही ,त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतात.क्यो हम लें खुशिया बहार सें जे. निसर्ग तर संपन्न आहेच पण त्याच्यावर कशाला अवलंबून राहायचं. भवताल पहा त्यातलं सौंदर्य शोधा, त्यात.जगण्याची उमेद आहे. माणसें शोधा, माणसें वाचा.
रात्री केवळ स्वप्नें पहायचीअसतात आणि सकाळी किरणांप्रमाणें उगवायचं, व उमलायचं असतं, दुसऱ्यांना फुलवायचं असतं. चाफा नाही का नं बोलतां, फुलतों आणि फुलवतों.
सूर्य रोज किरणां बरोबर येतो आणि जातो. फुलें आणि माणसें थोड्या वेळासाठी येतात. सुवांस आणि आठवणी ठेवून जातात.
अशी किरणें येती आणि स्मृती ठेवूनी जाती.
डॉ. अनिल कुलकर्णी.

मन

वडील..