ये दुनिया ये मैफिल मेरे काम की नही..

ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही..
सगळं आहे पण काहीच नाही, हवा आहे पण ऑक्सीजन नाही. फुलांचं झाडांवरच निर्माल्य होत आहे. फुलांना फुलायचं असतं ते गजऱ्यात माळण्यासाठी. देवाच्या चरणी, सुगंध देण्यासाठी, सुवास येण्यासाठी. जे बगीचें आपल्यासाठी फुललेंत त्यांना पाहता येत नाही. त्यांचं सौंदर्य न्याहाळता येत नाही,तर सगळं निरर्थक वाटतं.
सौंदर्याला बेदखल झालेलं आवडत नाही. सौंदर्य तरसत असतं स्तुतीला. वैभव पाहायला सुद्धा कोणीतरी लागतं. जीवनात सोहळे उत्सव, आनंद साजरा करायचा नाही तर जगायचं कशाला?हे जीवन जगता येणार नसेल, या जीवनात आपली स्वप्नं पूर्ण होणार नसतील तर काय कामाचे जीवन. ‘रुला के गया सपनां मेरा’ प्रमाणे स्वप्न आणि वास्तव दोन्हीही रडवत आहेत.
जिथे-सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहाते, पण सागरावर जाताच येणार नसेल तर काय कामाचें हे जीवन. आयुष्य आहे पण आनंद नाही. पिंजऱ्यातला पोपट जिवंत आहे, पण विहार करू शकत नाही, अशी अवस्था माणसाची झाली आहे. फुलपाखराचं बागडणं हेच आयुष्य असतं.
प्रत्येकाचंच दार ठोठावतोय मृत्यू
नको त्यांना हिरावून नेतोय मृत्यू
स्वप्नातल्या कळ्यां उमलू देत नाही मृत्यू
उरलीसुरली स्वप्ने पूर्ण करू देत नाही मृत्यू
जीवन भरभरून जगू देत नाही मृत्यु
अजून किती तरी सौंदर्य न्याहाळायचं आहे
अजून जगण्यावर शतदां प्रेम करायचं आहे
अजून कितीतरी संकल्प पूर्ण करायचे आहेत
मृत्यू तू यें पण आमच्यासाठी विकल्प म्हणून यें
आम्ही ठरवू तेव्हांच ये.
जीवन खूप सुंदर आहे पण त्याचा आस्वादच मी घेउ शकणार नसेल तर सगळं व्यर्थ आहे.
सूर्योदय, सूर्यास्त या पाहायच्यां अनुभवावयच्या गोष्टी आहेत.
आयुष्याच ही असंच आहे, आयुष्य नुसतं पहायचं नसतं अनुभवायचंही असतं.
शरीराला बंदिस्त करता येतं मनाला नाही. मन पाखरासारखं विहार करून येतं.
शरीर दुःखा ने विव्हळत असलं तरीही, मन आशेची भरारी घेत असतं, अखेरच्या श्वासापर्यंत. वैभव असून मैफल रंगणार नसेल तर सगळंच व्यर्थ वाटायला लागतं.
गोष्टी आवाक्याबाहेरचे असल्या तरीही त्यांच्याशी नातं जोडतायायलाहवं,सकारात्मकतेचं.
चंद्र प्रत्येकाच्या आवाक्यात नसला तरीही त्याच्या साक्षीनेच अनेकांचं प्रेम फुललं आहे.
तंत्रज्ञानाने करलों आसमान मुठ्ठी में शक्य झालं आहे.
पण माणसाला जवळीक तेची, स्पर्शाची अनुभुती हवी असतें.
ऑनलाइन व्हर्च्युअल जगात माणसें रमत नाहीत.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या अवतीभवती आपल्या गोष्टी, आपलीच माणसं असावी वाटंत पण नको त्या माणसा बरोबर रहावं लागतंय म्हणून त्याला हे विश्व कामाचं नाही असं वाटतंच.
माणसे आपल्या विचारातच, आपल्या माणसातच रमतात.
नाहीतर त्यांना अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा असेच वाटतं.
वैभव येतं तेव्हा ते भोगतां न येणं याच्यासारखं दुर्दैवी काहीच नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात संध्याछायेला
वैभव हात जोडून उभा असतं पण मधुघट रिकामां झालेला असतो.एक अज्ञात शक्ती जर मला हतबल करत असेल, आयुष्य जगण्यापासून परावृत्त करत असेल तर अशा जीवनाला काही अर्थ आहेका?असह्य होतं तेव्हा माणसंलक्ष्मणरेषाओलांडतात.
या देशात कोट्यावधींची मंदिरेआहेत,मंदिरातकोट्यवधीरुपये पडूनआहेत, या देशातल्या लोकांनासाधा श्वासही घेतायेतनसेलतरकायकामाचा.व्यवस्था जेव्हा कामाला येत नाही तेव्ह माणसाची अवस्था बिकट होते सगळं आहे पण काहीच नाही हे फार वाईट असतं.
पाखरासारखी खिलाडी वृत्ती आहे, फुलपाखरासारखं उडायचं आहे, स्वच्छंद, पण
उडायचं नसेल तर काय कामाचं?
हे जरी खरे असले तरी दुःखाला, वेदनेला जास्त वेळ कवटाळून बसू नये, ती एक मनाची अवस्था असते, त्यातून बाहेर येणे फार आवश्यक असतं. काही गाण्यातून जीवनाचं तत्वज्ञान पाझरतं.
“Our sweetest songs are those that tells us the saddest thoughts ”
नैराश्येच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण उभरलं पाहिजे.
पूर्वजांच्या संचिता वर आपण आज जगतोय.आयुष्याच्या संध्याकाळीही त्यांनी झाडे लावली म्हणून त्याची फळे आपण आज चाखतोय.
त्यांनी असा विचार केला नाही की आता हेआपल्याला काहीच कामाचं नाही, पण त्यांनी पुढच्या पिढीचा दूरदृष्टीने विचार केला त्यामुळेच आपल्याला आज आनंद दिसतोय. मग आपण आनंदाची पेरणी पुढच्या पिढीसाठी का करू नये. नैराश्येचे आणि दुःखाचे
ढग एका ठिकाणी थांबत नाहीत. मन स्वच्छ निरभ्र असेल तर आनंदाचा 🌈 इंद्रधनुष्य नक्कीच दिसणार.
गाणी विरंगुळा देतात म्हणून त्यांना कवटाळून नाही बसायचं. चाफ्या सारखा न बोलता काम करायचं आणि प्राजक्ता सारख आनंदाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात सांडायचा. रातराणी सारखं दरवळायच, एवढं तर आपण करूच शकतो, जीवनात ही घडी अशीच राहू दे साठी.
व्यवस्था बदलता आली नाही तरीही आपली अवस्था आपण निश्चित बदलू शकतो. मैफलीत आपण नसलो तरीही आपली मैफल नक्षत्रांचे देणे
म्हणून आठवणीत राहिली पाहिजे.
अशा मैफिलीच जीवनाला उभारी देतात.
डॉ.अनिल कुलकर्णी.

मन

वडील..