तुझे नाराज नही जिंदगी…

तुझसे नाराज नही जिंदगी..
जीवना तू इतकं भरभरून दिलं आहेस की तुझे आम्ही शतशः ऋणी आहोत.
कसली कसली माणसं आयुष्यात दिली, की त्यां माणसांच्या आठवणी वर आम्ही जगत आहोत. अशी माणसं खरंच होती कां? या विचारधारेवर आम्ही जगतो आहोत.
निसर्गात इतकं सौंदर्य आहे, माणसात इतकं सौंदर्य आहे, ते आम्हाला कळायला, समजायला वेळ, दृष्टी हवी. कितीतरी निसर्गाचे वैभव आमच्या दृष्टीआड आहे तरी माणसातलं चांगुलपणा आमच्या नजरेसमोर नाही त्यामुळे आम्हीच कुठेतरी कमी पडतो म्हणून तुझ्याबद्दल कसलीच तक्रार नाही
आम्हाला तक्रार आहे ती इथल्या व्यवस्थेची.
अशी माणसे होऊन गेली यावर आमचा विश्वासच बसत नाही, अशा माणसांचा आदर्श आम्ही घेऊ शकत नाही पण ती आमच्या आयुष्याचा ठेवा आहेत. आम्हाला समाधान आहे थोडं तरी आम्ही त्या दृष्टीने विचार करतो, मार्गक्रमण करतो हे काय कमी आहे. निसर्गातलं, माणसातलं सौंदर्य काळायला दृष्टी हवी. त्या बाबतीत आम्ही कमी पडतो आणि निसर्ग अनुभवलाच नाही, आम्ही माणसे समजूनच घेतली नाहीत. आम्ही माणसे वाचलीच नाहीत .खूप मोठा ठेवा त्याकडे एका विशिष्ट नजरेच्या चष्म्यातूनच आम्ही पाहात असल्यामुळे आम्हाला माणसातला चांगुलपणा, आदर्श, चांगले विचार याकडे आमचे लक्ष जातंच नाही. म्हणून तुला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. चांगल्या माणसातले आदर्श घेण्याएवजी दुर्गुण याकडेच आम्ही जास्त लक्ष देतो म्हणून आम्हाला उदास वाटतं. प्रतिकूल परिस्थितीत राहणं आम्ही शिकतच नाही आणि त्यामुळे आम्ही जगण्यातलं मर्म हरवून बसलो आहोत. खूप जीवनातल्या गोष्टीचा आम्ही नाश केला पण ते संपत असतानाच आम्हीच संपत चाललो, याची आम्हाला जाणीव सुद्धा झाली नाही.
जीवनातला सौंदर्य टिपण्यासाठी टिपकागद लागतो.सौंदर्याला कुऱ्हाड नाही चालत. इतके दिवस आम्ही नष्ट केले आता आम्हीच नष्ट होत चाललो आहोत.
जीवनाचं लॉक डाऊन झालं आहे.जीवन बदललं की जीवनशैली बदलते. जीवनशैली बदलली तरीही आपण हवी ती स्वप्न पूर्ण नाही झाली तरी बघूच शकतो.आपल्या स्वप्नांवर कोणाचा अधिकार नाही आपल्या स्वप्नांवर आपलाच अधिकार असतो.मनाचं लॉक डाऊन होत नाही,कारण मन चंचल आहे.लॉकडाऊन मुळेअनेकांची भविष्यातील स्वप्नं चक्काचूर झाली, अनेक आपले सोडून गेलें, हळहळ करू शकण्या पलीकडे माणसें काहीच करू शकत नाहीत. दुःख, शोक व्यक्त करणं मानवी जीवनात अटळ आहे, कुणाला चुकलं नाही पण दुःख व्यक्त करण्याची संधी नाही मिळाली की ते साचत जातं आणि व्यक्तिमत्त्वाला हानी पोहोचवतं. मरणदारी व तोरणदारी जायचं असतं पण इच्छा असूनही शक्य होतं ऑनलाइन ने क्रांती केली पण भावनांची माती केली. स्वप्न ऑनलाईन असलं तरी जगणं ऑफलाईन असतं.सुखाचे सोहळे आणि दुःखाचे सोहळे हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. देव नाही, देवा सारखी माणसे नाहीत.आवडत्या माण सांना पहायचं नाही त्यांच्याविषयीशी प्रेम व्यक्त करणं फक्त ऑनलाईनच. याची देहा याची डोळा असे मरण अनेकांनी अनुभवलं. लॉकडाऊनची दुसरीही बाजू ही होती.
लॉकडाऊन झाल्यानंतर खूप वाईट वाटलें, पण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश झाला..नेहमीची ती धावपळ, कंटाळवाणे चाकोरीबद्ध आयुष्य हे आपण सर्व अनुभवत होतो. जे आपल्या भोवती भवताल आहे ते जाणवलं, त्यामुळे एक वेगळ्याच विश्वात राहण्याची संधी, स्वतःबद्दल विचार करण्याची व मित्रांची, नात्यांची ओळख, त्यांचा सहवास त्यांच प्रेम, प्रेमातलं अंतर हे जाणवलं. ज्यांना वेळ देणं शक्य होत त्यांना तो दिला आणि त्यांचे विश्व समृद्ध केले.हे सर्व lockdown झाल्या मुळे झाले .वाईट वाटण्याचे कारण नाही. तरीही तुम्हालाआहे त्या परिस्थितीत राहण्याची संधी मिळाली, सभोवतालची जाणीव झाली.. चिंतन करण्याची संधी मिळाली.संवाद साधण्याची संधी मिळाली. विसंवाद दूर झाले तर अनेक प्रश्न मिटतात.माणसे संवादच करत नाहीत.संवादा साठी वेळ आवश्यक आहे. आम्ही एकमेकाला वेळच देत नाही. संवाद नसल्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.करिअरच्या नादात अनेक गोष्टी दुरावल्या, विसरल्या होत्या. निसर्गाशी संवाद नव्हता, निसर्गातलं सौंदर्य एरवी त्याच्याकडे कधीच लक्ष जात नाही. मनाला भावना असतात निवांत असल्यावर हे अनुभवता आलं. लॉक डाऊनच दुःख न मानता,सुख उपभगण्यासाठी ही निवांत वेळ हवा. पैसा कमावण्याच्या नादात अनेक गोष्टींवरआपण पाणी सोडतो, सुख हे त्यापैकीच. पण त्या दरम्यान एक स्वप्नातील वास्तव अनुभवता आलं., जुनी ओळख जपता जपता नवीन नात्यांच्या ऑनलाईन ओळखी होणार आहेत. लॉक डाऊन मध्ये अनेक जण आत्मनिर्भर झाले. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले. प्रत्येकाच्या दुःखाचा स्तर वेगळा असतो. माणसाची पहिली प्राथमिकता अस्तित्व टिकवणे हीच असते नंतर तत्वज्ञान असतं. संघर्षाशिवाय अस्तित्व नाही
ऑफलाइन विश्व ऑनलाईन झालं. दुरून डोंगर साजरे सारखं दुरून आयुष्य साजरे प्रमाणे दुरिया नजदिकिया बन गई .Beauty is only to see not to touch. आयुष्य जगायचं पण अंतर राखून.संशयाचे धुके होते पण आता ते अधिक दाट झाले.कुणाच्या घरी जाणं नाही ,कुणाला घरी बोलावणं नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चे संदर्भ बदललें. मुखवटे होतेच पण आता त्यांना राजमान्यता मिळाली. मुखवट्या शिवाय मनात् ही प्रवेश नाही.
लॉक डाऊन मुळे जीवनाचा संघर्ष वाढला आहे. life is not only bed of roses याची जाणीव झाली.संघर्ष प्रतिकार करायला शिकवतं आणि प्रतिकारशक्ती वाढली की यश सृजनाला घेऊन येतं. केवळ देवाची प्रार्थना करून यश मिळत नाही, देव आपल्या समोर संघर्षात्मक परिस्थिती ठेवतो आणि त्या परिस्थिती मध्ये आपण त्याचे आव्हान स्वीकारून यश गाठायचं असतं.
लॉकडाऊन म्हणजे बंधन.
बंधन म्हणजे जीवन.बंधन म्हणजे विषाणूचंही असू शकत.बंधन आहे म्हणून स्वैराचार नाही.बंधन आहे म्हणून अविचार नाही.बंधन हेच जीवनाचे संतुलन आहे. जीवन म्हणजे पहिला आणि शेवटचा श्वास यातील अंतर. दिवस भरले की आयुष्य संपलं असं म्हणलं जायचं आता फुप्फुस भरले की आयुष्य संपलं. पहिला श्वास स्वता:साठी महत्त्वाचा,शेवटचा श्वास ईतरासाठी दखलपात्र.शेवटी म्हणतात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहिला श्वास भान आणि अस्तित्व देतो.शेवटचा श्वास भान आणि अस्तित्व हिरावून घेतो. पहिला व शेवटचा श्वास आपल्या नियंत्रणात नसतो. मृत्यू कुणाला कधी येईल सांगता येत नाही. अचानक माणसे कां मरतात? प्रत्येकाच्या मृत्यूला निमित्त लागत कां? प्रत्येकाचा मृत्यू कादंबरीचा शेवट वेगळा वेगळा त्या प्रमाणे वेगवेगळा असतो का?.प्रत्येकाच्ं जीवन कादंबरीच असतें. कुणाची उत्कंठावर्धक, कुणाची बेदखल, कोणाची वाचनीय, कुणाची रटाळ.
सुखलोलुपते मुळे माणसे मरतात ,माणसे दारिद्र्यामुळे मरतात. संघर्षाच्या काळात अन्नासाठी दाही दिशा कराव्या लागतात.अन्नासाठी माणसे हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करत आहेत. उपाशी राहून आपल्या जन्मभूमीला जवळ करत आहेत. काही का असेना आपल्या घरी आपल्या जन्मभूमीतच मरण यावे असं प्रत्येकाला वाटतं. एक आई आणि मुलगी प्रवासादरम्यान भुकेने व्याकूळ होऊन मरण पावते आणि लहान मुलगी जिला कळत नाही आपली आई जिवंत आहे का मेली,ती आईच्या पदराशी खेळत बसते,याच्यापेक्षा हृदयद्रावक चित्र काय असू शकते. आई वडील आपल्या मुलीसह चालत अंतर कापत येतात काय आणि तिथं मुलीला साप चावतो काय, आणि तिचा मृत्यू होतो. रेल्वे रुळावर झोपलेली माणसें इतकी थकतात की रूळच मृत्यूच्या पायघड्या बनतात.
सहानुभूती दाखवणारा एक मोठा गट आपल्या समाजात अजून तरीअस्तित्वात आहे. बातम्या आता केवळ माहितीसाठी नाहीत. किती दुःख, किती वेदना बघायच्या आजुन बाकी आहेत. लॉक डाऊनच्या काळात अंतराचे नवीन नवीन पैलू समोर आले.
सामाजिक अंतर, भावनिक, मानसिक अंतर. आता अंतर हेच जीवन आहे.अंतर ठेवा, पण माणुसकीत नको. सगळी समीकरणं बदलली. जीवनशैली बदलली. चेहरे ,मुखवटे विभक्त झालें. माणसे कळाली, श्रमाची विभागणी झाली. गर्दी हा शब्द हळूहळू नामशेष होईल. माणसे एकमेकाकडे संशयाने पाहतील. विषाणूमुळेही जीवनाला शिस्त लागतें. स्वता, स्वतःतून उमलावें लागेल. स्वतः होऊन शिकांवं लागेल.कोणी शिकवणार नाही. अनुभव हाच गुरू राहील. द्रोणाचार्य नसल्यामुळे अंगठा द्यायचा प्रश्नच येणार नाही. माणसे शिकतच असतात परिस्थिती कडून. आपल्या क्षमता कळण्यासाठी संघर्ष हवाच. संघर्ष आणि त्यातून मिळणारा हर्ष हेच जीवनाचे सूत्र आहे.
माणसांच येणं निमित्तमात्र असतं आणि जाणं निमित्तमात्र असतं.
आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू दरम्यान चालणारे मनाचे खेळ. मन दिसत नाही,पण मन पाहू शकतं.मनातले तरंग आपल्या हातात नाहीत. मनातल्या तरंगाना कधी कधी वादळाचं स्वरूप प्राप्त होतं. आपल्या मनाची कधी सुनामी होईल सांगता येत नाही. समाधानावर मन जगतं. समाधान नसेल तर मन भरकटतं.
आतून मनातून येतं म्हणजे कुठून येतं, अजून कुणाला सांगता आलेले नाही. मन कोणावरही जडतं. मनात अनेक गोष्टी असतात. अनेक गोष्टी घडतात, सगळ्या सांगण्यासारख्या नसतात. मनात काहीही घडतं,मन काहीही घडवतं. शरीर मनाच्या अधीन असलेला गुलाम आहे. मन हत्या घडवून आणतंं,आत्महत्या घडवतं.मन अदृश्य आहे पण सगळं घडवण्याची ताकद त्याच्याजवळआहे. मनातल्या विचारावर
आपलं नियंत्रण नसतं. मनातल्या खेळावर आपलं नियंत्रण नसतं..स्वप्न, मृत्यू, आत्मा या सर्व आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी पण आपल्याला आवाक्यात ठेवणाऱ्या.
मन हे शेअर बाजाराप्रमाणे आहे त्यात आशा-निराशेचे चढ-उतार सतत चालु असतात. मनात गुंतवणूक करायची त्यासाठी शेअरचं निमित्त लागतं. मनाची गुंतवणूक सामाजिक परिस्थितीच्या अधीन राहून करावी लागते.मन काहीही शेअर कर तं,कुणाालाही शेअर करतं.सुखासुखी जगणारी दिसणारी माणसे अचानक जातात.
मृत्यूच्या दाढेतून हे अनेक जण परत येतात. काही मृत्यूबाबत माणसे तर्क करीत बसतात पण त्याच खरे कारण वेगळेचअसतं. प्राणी कुठे आत्महत्या करतात. नैसर्गिक मृत्यू स्वीकारतात, मग माणसाचं असं का? रक्तातून आनुवंशिकता झिरपते. अनुवंशिक तेतून कौशल्य झिरपतं, मग रक्त दिल्याने एखाद्या व्यक्तीचे गुणधर्म ज्या माणसाला रक्त दिले जाते त्याच्यात कां झिरपत नाही. मृत्यूनंतर माणसांच्या मेंदूच काय‌ होतं मेंदूतल्या विचारांचे थिंक बँक करता येईल का?
सुख पायाशी लोळण घेत असले तरी माणसें मरणाला कां जवळ करतात.
टोकाचं नैराश्य काहीजणांना सहन होत नाही. मृत्यूला जवळही करतात आणि औषधांनी आपला आयुष्यही वाढवतात लोकं. काहीजणांना शेवटच्या श्वासापर्यंत जगावसं वाटतं.
काहीजणांचं miless to go before I sleep पर्यंत नियोजन असतं पण man proposes God and virus disposes. विषाणू ही माणसाला उद्ध्वस्त करतात. पूर्वी आपला कार्यभार संपला की माणसे समाधी घ्यायची. आज सभोवताली भौतिक सुविधा यांची इतकी रेलचेल आहे की माणसाला मृत्यू नकोसां वाटत आहे.. शेवटच्या श्वासापर्यंत जगावस वाटतं. जिथे तर्क चालत नाही तिथे हक्काचा देव आहेच. गोष्टी अनाकलनीय असतात. काही मृत्यू अपघात की आत्महत्या हे शेवटपर्यंत समजत नाही. एवढा समाज प्रगत झाला आहे पण अजून तर्काची खुंटी नामशेष झाली नाही. लक्ष्मण रेषा आता केवळ वैधानिक इशारा आहे.
मृत्यूसमोर तर्क चालत नाही. प्रत्येकांं जीवन ठरलेलं असतं असं म्हणावं तर अंधश्रद्धा होते. आहे ते जीवन अनेकांना संपवाव वाटतं. चिते वरून ही माणसं जिवंत होऊन परत आलेली आहेत. अनेकांना संपत चाललेलं जीवन जगावसं वाटतं.
आज फिर जीने की तमन्ना है,
आज फिर मरने का इरादा है असंअनेकांना वाटतं.
काही लोकांच्या मृत्युने डोळ्याच्या कडा ओलावतात. काही माणसे अभिनय जगतात. अभिनय करत नाहीत.
अवकाळी मरण चटका लावतंच. मौत से डर नही लगता सहाब. मौत कैसे आयेगी ईस्का डर लगता है.
एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा जात-पात-धर्म न पाहता प्रतिक्रिया येतात तेव्हा त्या माणसाने आयुष्यात नक्कीच काहीतरी कमावलेलं असतं.चांगला अभिनेता चांगलं अभिनय करतो, असं नव्हे तर तो चांगलं जीवन जगतो. ज्याचं अनुकरण करतांना लोकं खरंच जीवन जगतात. मजुरांना स्वखर्चाने आपल्या गावी पोहचवणारे, जेवण पोहचवणारे ही माणसं अभिनय जगतात.
कुठे शिकली ही माणसं,कोणत्या शाळेत.शाळा बंदचं एवढं अकांड तांडव कां?शेवटी जीवनाचे प्रश्न सोडवता आले पाहिजे, हेच महत्त्वाचं आहे.
अनेक उत्कृष्ट अभिनेत्यांनी माणसांना आयुष्यात जे दिले त्याची गणतीच करता येणार नाही .कोणाचं आयुष्य सुधारण्यास मदत केलीय, कुणाला विरंगुळा दिला आहे.
माणसे येतात आणि जातात आपला ठसा , आठवणी ठेवून जातात. काही ठसे जात नाहीत आणि त्यांचे रंगही जात नाहीत.
काही माणसांचही असंच असत त्यांच्याव्यक्तिमत्त्वाचा ठसा कधीच पुसला जात नाही,आणि आपण तो पुसत ही नाही. मनाच्या गाभाऱ्यात आठवणींचा ,घटनांचा महापूर येतो तेव्हा माणसें कधी लॉकडाऊन होतात हे त्यांनाही कळत नाही. स्वप्नांचं लॉकडाऊन झालं, स्वप्नांचा मृत्यू झाला तरी पुन्हा पुन्हा नवीन स्वप्नांची भरारी तर आपल्या हातात आहे. सूर्योदयापूर्वीचा
सूर्यास्त म्हणजे शेवट न्हवें.
आहे त्यांना धरून राहणं,
उत्सव,वैभव, आनंदाचे सोहळे
भवतालांतच शोधायचें.आहे त्या
आपल्याच माणसांची मैफल
सजवायची व आपल्याच माणसांची सोबत इंद्रधनुष्य समजायचं.
तरच जीवन अनलॉक होईल.
डॉ.अनिल कुलकर्णी.
९४०३८०५१६३

मन

वडील..