ते गुपित

 • तुझे ते गुपित मी जीवापाड जपले होते,
  कैकदा तू मला बेसावध पकडले होते.

  तुला हवे ते चंद्र तारे मी कधी आणले होते,
  चांदणे माझ्या कुशीत रोज कोजागिरीचे होते.

  तुझ्या शपथा, खलिते का लपवायला दिले होते,
  गुलाबी चुंबनांचे ठसे त्यावर ओले होते.

  चोरून ह्रदय, ह्रदयातच कोण ऐवज ठेवत होते,
  चोर चोरी करत होता तरी खजिने भरत होते.

  तुझे गुपित लपवण्याच्या शपथा मी मोडत होतो,
  मनाच्या गाभ्यात तू तुलाच तर लपविले होते.

  गुपित तुझे आसपास कसे बरे कळले होते,
  आठवणींच्या फुलांचे अत्तर होते, ठाऊक नव्हते.

  स्मिता दातार.💖