सुरवात झाली की किती उत्साह असतो , मग ती कसली का असू द्या..
प्रेम खरे प्रत्येक माणसाच्या वाट्याला येते हे खरे आहे असे मानून आपण पुढे जात असतो. प्रेम म्हणजे तरी काय हो? जिथे आपला एकटेपणा वाटला जातो आणि एक हक्काच माणूस भेटते, अशा वेळेस आपण हजारदा विचार करत करत त्या प्रेमात पडतो का? नाही ते शक्य नाही , मानवी स्वभाव आणि त्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजा जिथे पुर्ण होतात कदाचित ते प्रेम आहे असेच आपण धरुन पुढे चालत राहतो.
असो प्रेम होने,करने आणि मिळवने सगळ्या निरनिराळ्या गोष्टी आहेत.
मी सुखी आहे किंबहुना होणार आहे हा आत्मविश्वास प्रेमाने मिळतो हे जरी खरे असले तरी प्रेम मात्र प्रत्येक जोडप्याला हे वेगवेगळ्या कारणांमुळे बांधून ठेवते असे म्हटले तर गैर होईल का?