प्रेमाची व्याख्या

प्रेमाची व्याख्या

प्रेम हे एका शब्दापुरती मर्यादित नसतं तर प्रेमाची व्याख्या ही अमर्यादित असते.प्रेम म्हणजे फक्त प्रियकर आणि प्रेयसीमधलच नसतं.प्रेम हे सगळ्याच नात्यांचा आधार असतो.प्रेम हे साय्राच नात्यांची सुरूवात असते.प्रेमामुळे नाती घडतातही आणि टिकतातही.प्रेम म्हणजे जिव्हाळा,आपुलकी,विश्वास आणि माणुसकी असते.माणुसकी ही तर प्रेमाची अनुभुती असते.प्रेमामुळे मन जिंकता येतं,ह्रदय जिंकता येतं आणि सारं जगही जिंकता येतं.प्रेम हे फक्त माणसांपुरतीच मर्यादित नसतं.प्रेम हे प्रत्येक प्राणिमात्रांवरचं,निसर्गावरचं,गोष्टींवरचं,वस्तूंवरचं पण तितकच महत्वाचं असतं.प्रेम हे चिरकाल असतं.प्रेमाला मर्यादा नसते.प्रेम हे अमर्याद असते.जीवनात प्रेम हे महत्वाचे असते. प्रेम हा जीवनाचा आविभाज्य घटक आहे. प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे. प्रेमाने मन फुलते आणि जीवन बहरते.

-सुप्रिया तेंडुलकर-