सिनेमा

भारतामध्ये काही अत्युच्य कोटीच्या प्रतिकृती निर्माण झाल्या आणि त्यावर देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष देखील झाले अशीच एक प्रतिकृती म्हणजे ‘ पिंजर’ सिनेमा, हा सिनेमा भारत देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान नावाचा एक तुकडा तयार होतो त्यावेळी सीमावर्ती भागातील ही कहाणी आहे नायिका आहे पुरो शाह जी हिंदू आहे जिचं लग्न रामचंद्र नावाच्या तरुणाशी ठरलेलं आहे हे लग्न होण्यापूर्वीच तीच रशीद शेख या युवकाकडून अपहरण होत , पूर्वीपासून शाह आणि शेख यांच्या पिढी मध्ये दुश्मनी असते त्या दुश्मनी चा दबाव रशीद वर असतो त्यातून तो तीच अपहरण करतो व लग्न ही करतो रशीद वर या गोष्टीचा पश्चाताप आहे आणि पछतावा देखील. एका रात्री पुरो रशीद च घर सोडून पळून जाते परंतु तिचे आई वडील तिचा धर्म भ्रष्ट झाला म्हणून तिला स्वीकारण्यास नकार देतात बदला बदली ची पद्धत असल्याने पुढे रामचंद्र चे लग्न पुरोच्या लहान बहिणीसोबत होते व पुरोच्या भावाचे लग्न रामचंद्र च्या बहिणी सोबत होते रशीद मात्र आयुष्यभर पुरो वर प्रेम करतो फाळणीनंतर धार्मिक दंगली होतात ही सगळी कुटुंबे विखुरतात परंतू पुरो व रशीद च्या प्रयत्नाने पुन्हा एकत्र येतात ,‘‘कोई लड़की हिन्दू हो या मुसलमान, जो भी लड़की लौटकर अपने ठिकाने पहुंचती है, समझो उसी के साथ मेरी आत्मा भी ठिकाने पहुंच गई…’’अस पुरो म्हणते . या सिनेमामध्ये अनेक सामाजिक रूढी पद्धती दाखवल्या आहेत परंतु त्या चूक की बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने अजिबात केलेला नाहिये .
सिनेमा का पहावा? पिंजर मध्ये स्त्री ची पीड़ा आहे, वेदना आहे, संताप आहे त्याग ,ममत्व आहे त्याच्यासोबत पुरुषांचा अपराध देखिल आहे हिंदू आहे मुसलमान आहे विभाजन चा दंश देखिल आहे धर्मांधता च्या विरुद्ध उभे असणारे मानवीय मूल्य देखील आहेत

सिनेमा