राधेचे रूप।

  • *राधेचे रूप।*

कसे सांगू शब्दामध्ये
राधा माझी कशी आहे
प्रत्तेक गोपिका लाजेल
अदा तिची अशी आहे.……।।

राधा माझी माऊली सारखी
प्रेम बनून वाहणारी
राधा माझी हवे सारखी
सतत साथ देणारी
राधा म्हणजे प्रेमाचे
फक्त एक सुखं आहे
कसे सांगू शब्दामध्ये
राधेचे जे रुप आहे…….।।१।।

राधा जणू सागरासारखी
खळखळून हसणारी
शिपल्या गणित लाखो दुःखं
खोल लपवून ठेवणारी
बोलणं जणू लाटेमागे
अजून एक लाट आहे
कसे सांगू शब्दामध्ये
राधेचे जे रुप आहे…….।।२।।

अश्रु तिच्या नयनी कधी
टपोरे ते मोती
त्यांची किंमत कशी सांगू
सगळीच रत्ने खोटी
तिच्या एक एक अश्रू मागे
माझे ठोके चुकत आहे
कसे सांगू शब्दामध्ये
राधेचे जे रुप आहे…….।।३।।

हास्य माझ्या राधेचे
पावसाच्या सरि बरसती
भिजवून साऱ्या गावाला
माझ्यावरती परतती
तिच्या हास्य पुढे सारे
भ्रमांड सुद्धा मूक आहे
कसे सांगू शब्दामध्ये
राधेचे जे रुप आहे…….।।४।।

कसे सांगू शब्दामध्ये
राधेचे जे रुप आहे…….

अशी आहे माझी राधा

जय श्रीकृष्ण।।💐💐💐
*श्री.सचिन शिंदे*