ये पुरुषी हैवाना ……
तुझा जन्म पण त्याच एका उदरातुन झाला, हे कसं विसरलास रे ?
नऊ महिने रक्त शोषलसं, अजुन पण पोट भरलचं नाही रे !!
जन्मा आधीच, ती च्या जीवावर उठलास कि रे
तुझ्या वंशांच्या दिव्यानेच, आज काय दिवे लालवलेत जरा बघ रे !!
शोषीकतेचा कलंक, तिच्या कपाळावर कायमचा मारलास कि रे
तिच्या सहनशीलतेचा अंत का पाहतोस ? ती तर महिषासुराचा कर्दनकाळ रे !!
उच-नीच भेदभाव समाजात, तूच पसरवलास कि रे
मानवतेचा गळा घोटणारा ,तू तर निर्दयी जल्लादच रे !!
जाती-पातीच्या राजकारणावर पोळ्या भाजणारा, तू दुराचारी की रे
रामाच्या राज्यातच, रावणांचा किती हा सुळसुळाट रे !!
त्या आंधळ्या देवीला ,बहिरं ही करुन टाकलचं की रे
पण काळ्याकुट्ट अंधारातूनच जातो, सत्य-न्यायाचा मार्ग रे !!
राहुल माने, आपण वास्तव मांडलेत.