Technologicle Life

👌खूप छान *Technological* कविता
—>

*Out dated* झालंय आयुष्य,
स्वप्नही *download* होत नाही,
संवेदनांना *virus* लागलाय,
दु:खं *send* करता येत नाही.

जुने, नात्यातील उमाळे उडून गेलेत,
*Delete* झालेल्या *file* सारखे,
अन घर आता शांत असतं,
*Range* नसलेल्या *mobile* सारखे.

*Hang* झालीय *PC* सारखी,
मातीची स्थिती वाईट,
जाती मातीशी जोडणारी,
कुठेच नाही *website*.

एकविसाव्या शतकातली,
पीढी भलतीच *cute*,
*contact list* वाढत गेली,
पण संवाद झाले *mute*.

*Computer* च्या *chip* सारखा,
माणूस मनानं झालाय खुजा,
अन *mother* नावाचा *board*,
त्याच्या आयुष्यातून झालाय वजा.

*Hard Disk Drive* मध्ये,
आता संस्कारांनाच नाही जागा,
अन फाटली मनं सांधणारा,
*internet* वर नाही धागा.

विज्ञानाच्या गुलामगिरीत,
केवढी मोठी चूक,
रक्ताच्या नात्यांनाही आता लागते,
*WhatsApp* & *Facebook*.

🤔⁉️🙁🤓😢