अनामिक ओढ

*अनामिक ओढ*

◼️विकास सरांनी रागाने मोबाईल उचलला व त्यांनी मानसीला msg केला- “तुम्हाला काय करायचे ते करा, माझ्या समोर पुन्हा येऊ नका. आपण एकत्र काम करु शकत नाही.”
त्यानंतर ते स्वतःवरच खूप संतापले आणि हातातला फोन भिंतीवर जाऊन केव्हा आदळला हे त्यांच्याही लक्षात आले नाही.त्यांची अस्वस्थता अधिकच वाढली. प्रत्येक गोष्ट मनासारखीच व्हावी आणि त्यांनी सांगितली की लोकांनी त्यांची सर्व कामे बाजूला ठेऊन त्यांना प्रायोरिटीज देत झटपट हवीच हा हेकेखोरपणा हा त्यांचा स्थायीभाव होता.”जाऊ दे त्यांना ना …..त्या नाही आल्या तर माझं काय अडलय? माझ्या संस्थेत काम करायला आजच दुसऱ्या कोणाला तरी इंटरव्ह्यूसाठी बोलावतो” असं स्वतःशीच पुटपुटत त्यांनी अक्षरशः दोन-तीन शिव्या हसडल्या आणि ते हलके झाले. बाकीच्या कामाला सुरवात करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण विकासचे कामात लक्ष लागत नव्हतं. सायंकाळी सातचे टोल घड्याळात पडले तरी ते बसून फक्त कुठल्याशा शुन्यात कसलातरी शोध घेत होते…

◼️मात्र दुसऱ्या दिवशी महत्वाचे लेक्चर असल्यामुळे सकाळी नेहमीच्या वेळेला म्हणजे सकाळी बरोबर आठ वाजता मानसीची क्लासमध्ये एन्ट्री झाली. घरातली सर्व जबाबदारी पार पाडत सर्व आवरून ते आली होती. विकास सरांच्या चिडण्याची तिला आता सवय झाली होती. ह्या सगळ्या चिडचिडीत क्लासच्या स्टुडंटचं नुकसान करणे तिच्या मनाला पटणारे नव्हते.
आज तिला क्लासच्या सगळ्या स्टुडंटना महत्वाच्या नीटस् द्यायच्या होत्या. मानसी लगबगीने केबिनमध्ये गेली आणि लेक्चरच्या नोटस् उचलल्या आणि त्या उचलताना
विकास सरांची आणि मानसीची नजरा नजर झाली पण क्षणभरच… मानसीने लगेच स्वतःला सावरले आणि तिची पावले झर्रकन क्लासरूम कडे वळली. विकास सरांच्या ह्रदयात रागाची भट्टी अजूनही धगधगतच होती. सरांनी मानसीकडे दुर्लक्ष करत आपली कामे झटपट उरकण्याचा सपाटा लावला.

******’सरांना जेवढा राग यायचा तेवढे ते जास्त बिझी राहण्याचा आटापिटा करायचे.पण मानसीच असं अजूबाजूला वावरणं, इतरांशी बोलणं, खदखदून हसणं त्यांना अधिकच अस्वस्थत करत होत आणि त्यांच कामातील सार लक्ष डिस्टर्ब होत होत. त्यामुळे अर्थातच रागाचा डेम्पो अजून चढतच होता. एकूण काय आपल्याला कशाचा काही फरक पडत नाही हा माज दाखवायच्या परिस्थितीत ते जास्तच विचित्र वागायचे.शेवटचं लेक्चर संपत आलं तरी मानसी अजून एक शब्द देखील बोलली न्हवती त्यामुळे ते अधिरतेने लेक्चर संपायची वाट पाहू लागले. तेवढ्यात बाहेर लेक्चर संपल्यामुळे मुलांचा गलका त्यांना ऐकू आला व तो केबिनच्या बाहेर आला. पण बऱ्याच मुलांनी तिच्या भोवतीने गराडा घातला होता. सरांना माहीत होतं की स्टुडंटच्या लाडक्या मानसी मॅडम आता लवकर फ्री होणार नाहीत कारण ह्यां कायम मुलांच्या घोळक्यात अडकलेल्या असतातआणि सतत मुलांच्या अवतीभवती राहायचं, मुलांचे प्रॉब्लेम स् ऐकत बसायचं.बाकी इतर ही अनेक काम असतात तर केबिन मध्ये लवकर यावं ह्याच भान ही त्यांना उरत नाही. ह्याचा अधिकच राग सरांना आला. शेवटी न राहून त्यांनी गाडीची किल्ली उचलली व झपाझप पावले टाकत ते क्लासच्या बाहेर निघूनही गेले.मानसीने त्यांना जिन्यावरून जाताना पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं पारा चांगलाच चढलेला दिसतोय आणि ती मनातल्या मनात हसली. पण तिने लक्ष नाही दिलं कारण त्यांचा हा नेहमीचा अटीट्यूड तिला सवयीचा होता. तरीही सर जिन्यातून जाई परेन्त ती त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.
◼️ दुसऱ्या दिवशी तिला सकाळ पासूनच लेक्चरस् होती त्यामुळे ती गडबडीतच होती पण आज नेमके बाकी कुणाचीच लेक्चरस् नव्हती. सर पण आज सकाळ पासून आले न्हवते का ते कळवले देखील न्हवते. त्यामुळे तिने लेक्चर झाल्यावर पटकन घरी जायचे ठरवले आणि ती पटापट सगळं उरकू लागली.आज क्लास संपल्या संपल्या सगळी मुलं खाली पळाली. मानसीने ही घरी जाण्या आधी उद्याच लेच्चरचं टाइम टेबल चेक केलं आणि डोक्यावर हातच मारला. का तर उद्या विकली क्लासटेस्टचा दिवस होता. सो ती पुन्हा खुर्चीत बसून राहिली कारण आता तिला उद्याचा पेपर काढावा लागणार होता.तिने लगेच घरी परतण्याचा विचार कॅन्सल केला आणि ती पेपर काढण्यासाठी कपाटातून पुस्तक शोधू लागली. तेवढ्यात तिला मागून कुणी तरी मिठी मारली आणि ती एवढी घाबरली की ती एकदम ओरडलीच कारण पूर्ण क्लास मध्ये ती एकटीच होती आणि ती झ…र्कन मागे वळली तसे तिच्या केसांनी विकास सरांचा चेहरा झाकून गेला. विकास सरांनी हळूवार चेहऱ्यावरील तिचे काळेभोर केस बाजूला केले आणि तिला खसकन् जवळ घेतली पण मानसीने त्यांना पटकन बाजूला सारले आणि ती त्यांच्यावर चिडलीच ,” ही काय पद्धत? मी एकटीच इथे आहे आणि असे घाबरवतात का?आणि मला नाही बोलायचं तुमच्याशी.तुम्ही जावा इथून तशी ती स्वतःची त्यांच्या मिठीतून सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्न करू लागली. पण विकास सरांनी तिला अगदी घट्ट जघडून ठेवलं होतं. पण ती बाजूला होण्याचा प्रयत्न करून म्हणाली, “सर बास,तुमची सततची चिडचिड,सारखी गुरगूर का मी ऐकू ,मला तुमच्याशी बोलायचं नाही आणि तुम्हीच म्हणालात ना समोर नको येऊ मग कशाला समोर आलात?” पण विकास सर तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता गालातल्या गालात हसत तिला अधिकच आपल्या मिठीत ओढून घेत होते. तिचे काहीही न ऐकता त्यांनी रुबाबाने मिठीत तिला विरघळून टाकले.
◼️खरं तर मानसीला सरांचा खूप राग आला होता ती धसमुसतच घरी आली. पण तिच्या डोक्यातील विचार जात न्हवते. ह्यांच काय चालू असत?नक्की काय प्रॉब्लेम आहे ह्यांचा? पण तरीही तिच्या लक्षात येत होत की विचार करून काही उपयोग नाही. आपला फोकस कामावर ठेवायचा बास आणि तिने त्यांच्या विचारातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण तितकाच त्यांचा राग ही मनातून जात न्हवता त्याच विचारात ती झोपून गेली.
◼️त्या दिवशी मानसी केबिन मध्ये बसली होती तिला काही पेपर्स चेक करायचे होते तेवढ्यात तिचे लक्ष एका इन्हिटेशन कार्डकडे गेलं आणि ते सरांच्या लक्षात येताच ते तिला म्हणाले की,”तुम्हाला पण रविवारी माझ्या बरोबर यावं लागेल माझं मॅनेजमेन्टवर लेक्चर आहे” “मी कशाला’? मानसीने केसांना झटका देत सरांच्याकडे पाहत विचारले. विकास सरांनी पण तिच्या केसांवर हळुवार कुरवाळत तिला अगदी आपल्या जवळ खेचतच बाजावले , “मला तुम्ही बरोबर हवे आहात , बास.” त्यांच्या हा तोरा पाहून तिने एक तीक्ष्ण नजर त्यांच्यावर टाकली पण त्यांनी हळुवार तिचे चुंबन घेत तिचे अलगत डोळेच बंद केले. सरांचा बिजनेस माईंड खूप जबरदस्त होता.एकावेळी अनेक कामे हाताळणे त्यांना सहज जमत होते. ज्या तोऱ्यात त्यांनी आदेश तिला दिला होता त्याचे काहीच उत्तर न देण्याचा ऑप्शन तिच्याकडे न्हवता. शनिवारी त्यांनी तिला msg केला,” आपल्याला एकत्र जायचंय वेळेत तयार रहा.”
दुसऱ्या दिवशी ती मस्त गुलाबी रंगाची साडी नेसून तयार होऊन बसली पण विकासचा msg आला की तो आलरेडी हॉलवर पोहचला आहे तुम्ही डायरेक्ट या .खरं तर तिला जायचं नव्हत पण ती आता आवरून बसलीच होती तर तिने जाण्याचा निर्णय घेतला. पण सर पुढच्या रांगेत सगळ्या मेन गेस्ट मध्ये बिझी होते त्यामुळे ती मागे एकटीच संकोचून बसून राहिली. त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर पण सर त्यांच्या लोकांच्यात बिझी होते म्हणून ती लगेच घरी निघून आली. तिला वाटते ठीक आहे सगळे आलेत म्हंटल्यावर वेळ बाकी लोकांना वेळ द्यायला हवाच. पण खरं तर ती थोडी नाराज होते की हे अस काय वागणे पण नंतर विचार करते,” जाऊ दे आपल्याला कामावर फोकस करायचा आहे बाकी कशाला विचार करायचा असे म्हणून ती झोपणारच होती तितक्यात सरांचा फोन आला,”तुम्ही काय समजता स्वतःला?तुम्ही असे का वागलात?असे अचानक निघून का आलात? आणि त्यांनी जे बोलायला सुरुवात केली ते थांबलेच नाहीत.मानसीला काहीच समजेना नक्की काय झाल. आपलं नक्की काय चुकलं? खरं तर तिला अश्या इव्हेंट मध्ये जायची सवय नव्हती .पण आता मात्र तिला सरांचा भयंकर राग आला होता त्यामूळे तिने सरांशी आता कधीच बोलायचे नाही असे ठरवले. त्या दिवसा पासून तिने अगदी स्ट्रिकटली वागायचे ठरवले आणि ती आपले काम करत राहिली.पण तरीही तिला समजत नव्हत की असं फोनवर सरांना इतकं उचकायला काय झालं होतं.तिला कळत न्हवत इतका त्रागा, धडपड आणि इतका माज का ?आणि काय उपयोग याचा .क्षणात ह्यांना वाटलं तर एकदम सॉफ्ट वागणं त्यातही खरं तर माज डोकावतोच. पण हा असा अचानक सगळा डाव उधळून लावायचा. जसं मी म्हणेन ते राज्य ,मी सांगेन तेच शासन.पण त्यांना समजत नाही की असं वागून आपल्या जवळची सगळी माणस, नाती, मैत्री तुटू शकते आणि तसही धागा तुटायला वेळ नाही लागत.धागा ताणला की संपलं सगळं. नंतर किती ही प्रयत्न करून धागा जोडला तरी त्या धाग्याला जी गाठ राहती कायमची.जे अंतर निर्माण होत ते कायमच. मग तुम्हाला कितीही वाटलं की आपण धागा जोडलाय तरी त्या नात्याला एकसंगता राहत नाही.पण त्यांची ती विवेकबुद्धी काम करेल तर ना?पण असो माणसानं किती ही त्रागा केला, राग-राग केला तरी त्या भावना किती काळ टिकणार आहेत?कोणत्या ही भावना ह्या क्षणभंगुर असतात.त्या भावना येतात आणि जातात.मग ती भावना प्रेमाची असो द्वेषाची असो.
◼️त्या दिवशीचे सरांचे शब्द ऐकून तिने पुन्हा तिकडे पाऊल न ठेवण्याचे ठरवले आणि ती आपापल्या कामात व्यापून गेली.अगदी त्यांचा नंबर देखील तिने डिलीट केला.पण मनातून काही गोष्टी पुसून टाकता येत नाही.त्यामुळे अधून मधून सरांचा तो राग,ती चिडचिड आणि त्यांचा तो माज आठवायचा तिला आणि खरं तर तिला त्याच हसू देखील यायचं.
◼️पण काही महिन्यांनी त्यांचा अचानक फोन आला की काही स्टुडंट आहेत शिकवणार का? मानसीला शिकवण प्रचंड आवडायचं त्यामुळे तिने न राहून होकार दिला.पण पुन्हा तिला भिती वाटू लागली की सरांचा तो लहरी स्वभाव पुन्हा तेच गैरसमज काय करावे?पण मानसीला बीजनेससाठी सरांची मदत खूप महत्त्वाची होती. खरं तर त्यांचा माज करण तिला आवडायच. कारण सर रागाच्या भरात कितीही बोलले तरी ते तेवढ्या पुरत असत.त्यांचा राग खरं तर खोटा असतो काही क्षणात तो वितळून जातो.पण तरी ही मानसीला हे पटत न्हवत की म्हणून समोरच्याला असं सतत घायाळ करायचं का?पण तिला माहीत आहे की सर केवळ तिला शब्दांनी घायाळ न्हवते करत तर त्यांची ती सतत रोखून पाहणारी करडी नजर ही घायाळ करत होती त्यांच खसकन् जवळ ओढन देखिल तिला घायाळ करायचं,त्यांची ती दादागिरी अगदी सगळंच घायाळ करायचं. पण एक मात्र नक्की की ह्या नात्याला काय नाव द्यावं? न हे प्रेम होतं न ते दोघे रिलेशनशिप मध्ये होते न दोघांच्यात कोणतं नात होत.मग काय आहे हे……
◼️विकास सर मात्र तिच्यावर पुरते घायाळ होते.ती सतत समोर असावी ,बरोबर असावी ,आपल्याला सोडून तिने कुठे जाऊ नये असं त्यांना वाटायचं आणि त्यांच्या रागातून ही ते जाणवायचं.खरं तर त्यांच्यात होणारे सततचे गैरसमज ह्या मुळे तेंच जास्त अस्वस्थत व्हायचे.आपल चुकतंय ,आपण असं वागायला नकोय हे त्यांना समजत होत पण तिने अबोला धरला की ते स्वतःलाच दोष देत राहायचे आणि स्वतःवरच संतापायचे आणि ह्या सगळ्यात त्यांचा विक्षिप्तपणा अजूनच वाढायचा पण बाकीच्यांना तो त्यांचा माज वाटायचा.
सरांचं तिच्यावर खूप प्रेम होतं असं नाही पण तिची ओढ मात्र होती.तिचा सहवास आवडायचा,तिच ते शांत राहणं, समजून घेणं ,सगळी काम परफेक्ट करण आणि कामा प्रती तिची निष्ठा त्यांना जाणवत होती .
म्हणूनच कितीजण येऊन गेले तरी त्यांना मानसीची उणीव भासत होती .
म्हणूनच त्यांनी तिला पुन्हा बोलवले होते.ते वाट पाहत होते तिने यावं आपल्याबरोबर काम करावं, हक्काने सगळी काम आपल्या हातात घ्यावीत या वेड्या आशेत ते तिला येण्याची गळ घालत होते आणि नकळत स्वतःलाच बजावत होते की मी तुला पुन्हा असा दूर नाही जाऊ देणार पण तू ये… प्लिज ये… लवकर.
◼️विकास इतकाच विचार करत होता की आता मी त्यांना फोन केला आहे तर त्या परत येतील का?पण मी आज ही वाट पाहतोय की कधी त्या पुन्हा माझ्या समोर येतील. का अजून त्या माझ्यावर रुसल्या असतील? पण मला त्यांना सांगायचं आहे की तुमची माझ्यावरील जादू अजून कमी नाही झाली.अजून ही मी तितक्याच आतुरतेने तुमची वाट पाहतोय.आत्ता ही मला असं वाटतंय की त्यांना जोरात ओरडाव आणि विचारावं,”का तुम्ही माझ्या पासून दूर गेलात?आणि माझी कधीच आठवण आली नाही का? मला माहित आहे की त्या जर आत्ता समोर असत्या आणि त्यांना मी अस काही बोललो असतो तर त्या नजर खाली घालून गप्प बसल्या असत्या आणि त्यांच असं गप्प बसणं मला नेहमी सारख सहन झालं नसतं आणि मग मी नेहमी सारखाअधिकच चिडलो असतो आणि त्यांच्या जवळ गेलो असतो. त्यांना खसकन जवळ खेचलं असतं आणि माझ्या पासून दूर जाण्याचा जितका प्रयत्न त्यांनी केला असता तितकचं मी त्यांना प्रेमाने मिठीत घट्ट जखडून ठेवलं असतं आणि माझ्या पासून लांब राहण्याची शिक्षा म्हणून न थांबता त्यांचे चुंबन घेत राहिलो असतो आणि अश्या अवस्थेतच मी त्यांना विचारले असते, “सांगा ना ,तुम्ही का अश्या आहात?का मी तुमच्याकडे सारखा सारखा असा ओढला जातोय?सांगा ना , सांगा ना ,पटकन सांगा ना प्लिज.” आणि माझ्या अश्या अधीर वागण्याने त्या खळखळून हसल्या असत्या आणि मग मात्र मी त्यांना आणि त्यांच्या अवखळ हसण्याला माझ्या हृदयात कायमच साठवून ठेवल असतं.

लेखिका
कृष्णनी