मित्राची थोरवी

मित्राची थोरवी

मित्रांनो आज सर्वांना माहिती आहे की, मित्र म्हणजे
काय? तर मित्र म्हणजे आपल्या जीवा-भावाचा स्नेही. मित्र या दोन, अक्षरात फार मोठी शक्ती दडलेली आहे, ती या कलियुगात साथ देणारी देणगीच आहे. याच दोन शब्दाने या अथांग पसरलेल्या जनसागरात केव्हा मायेची एक झुळूक फेर घालते, तर केव्हा वैरीची एक लाट ही उसळत असते. पण या मित्र शब्दात किती मोठी शक्ती आहे,हे कोणी जाणले का? या शब्दात जी जादू आहे, ती न कधी संपणारी अन् कधी न तुटणारी,ती या जनसागरात पिढ्या न पिढ्या अमरत्व घेऊन आली आहे.
          
              या दोन शब्दात जी नाती जुळतात ती सूर्याच्या प्रखर तेजा प्रमाणे सत्य असतात, इतकी जादू यात आहे.
की, जणू एखाद्या माणसाच्या सावली सारखी त्याला ती जुडली आहे. जेव्हा कधी संकट रुपी शिळ आपल्या मित्रावर
पडणार तोच त्याचा बचाव करून नेहमी त्याच्या जवळपास
कायमस्वरूपी असते. मित्र याच शब्दाने सर्वांचे मन सुमनागत
फुलून जाते अन् हृदय गच्च हर्षून जाते.

                 आज या जनसागरात “मित्र” हा आपल्या नातेवाईकांहून जवळचा आणि मायेचा वाटतो. अशा या गाढ मैत्रीत मित्र मित्रांसाठी बलिदान देण्यास माघार घेत नाही. आपण जे काही गुपीत किंवा गोष्ट आपल्या आई-वडिलांना
सांगत नाही, तेच गुपीत आपल्या मित्राला सांगितल्या वाचून राहत नाही. मित्र हा आपल्या जवळचाच नव्हे तर आपल्या जिव्हाळ्याचा भाग असतो. मैत्री ही मनाच्या जुळनीतून निर्माण होते, अन् कोमल झ-या सारखी वाहत जाते.
“मैत्री असावी नितळ झ-यागत,
जणू निःस्वार्थ ममतेची कस्तुरी,
परि नसावी जल फुगा-यागत,
स्पर्शता क्षणात विरून जाणारी.”… //धृ//
जणू मैत्रीचा हा कोमल झरा जिकडे वाहत जातो, तिकडे त्यास अनेक प्रवाह मिळत जातात, अन् भला मोठा “मित्र सागर ” तयार होतो. मैत्री ही वाढत जाणारी वेल आहे, त्यात कधी खंड पडत नाही. आज मित्रासाठी कोणी सुखी नाही, की, कोणी दुःखी नाही. मैत्री ही सर्वांना पाठींबा देणारी एक “रत्नपेटी” असून न संपणारी संपत्ती आहे. तेव्हा कोणी म्हटले ही आहे की, संकटात येतो तोच खरा मित्र.
“friend is need in Friend is did.” अन् असे म्हणावे ,
“friendship is one of the Best Part of in Our Life ” And. “There were no Life, Without friend.
तसेच मित्र मिळत जातात, त्यात सर्वाच चांगले किंवा जीवलग असतात असेही नाही, तर काही वाईट ही म्हणजे गरजेपोटी मैत्री करणारे असतात. मित्र म्हटले म्हणजे
अनेक प्रकारचे असतात. उदा. टाईमपास, वाईट वळणावर नेणारे, कामापुरते, गरजेपोटी मैत्री करणारे, तर काही चांगले विचार मनात रुजवणारेही असतात. पण खरा मित्र त्यालाच म्हणता येईल की, जो सुर्याप्रमाणे आपणांस जागृत आणि मोहीत अशा प्रकाशात ठेवून जपत असतो.