नविन पसायदान कोरोना

*New Version of “पसायदान”*

आता सर्वात्मके जीवे ।
विनाकारण न फिरावे ।
घरीच बैसोनि रहावे ।
निवांतपणे ॥ 1॥

एकमेका कर न मिळवावे ।
दुरुनीच नमस्कारावे ।
अंतर सुरक्षित राखावे ।
परस्परांमाजी ॥ 2॥

सदासर्वदा हात धुवावे ।
रुमालाविणा न शिंकावे ।
कोमट जल प्राशावे ।
थंड वर्जावे सर्वथा ॥ 3॥

घरी येता जरी कंटाळा ।
मदत करावी गृहिणीला ।
पुण्य लागे जीवाला।
पत्नीव्रताचे॥ 4॥

करा स्वच्छता सदनाची ।
त्याच बरोबर तनाची ।
काढा जळमटे मनाची ।
शुचिर्भूत व्हावया ॥ 5॥

करा मनन आणि चिंतन ।
थोडा वेळ नामस्मरण ।
चुकविता येईल मरण ।
स्वतःसहित इतरांचे ॥ 6॥

आजपावेतो खूप पळाला।
आता विश्रांती शरीराला ।
सादर व्हावे समयाला ।
संत वचन हे असे ॥ 7॥

आहे विषाणू चे संकट ।
करा मनाला बळकट ।
ध्यानयोगाचा वज्र तट ।
उभारावा भवताली॥ 8॥

समय नव्हता म्हणोन ।
केले नसेल वाचन ।
ज्ञानेश्वरी ग्रंथ पावन ।
आता तरी वाचावा ॥ 9॥

आयुष्याला पुरेल ।
पुरोनिया उरेल ।
ग्रंथांची ऐसी रेलचेल ।
आहे संतकृपेने ॥ 10॥

आवाहन करती वारंवार ।
दिल्ली आणि मुंबईकर ।
धोका वाढेल फार ।
बेफिकीर राहता ॥ 11॥

शासन,पोलिस,डॉक्टर ।
स्वच्छतेचेही शूरवीर।
सेवा देती अहोरात्र ।
स्मरण त्यांचे असावे॥ 12॥

हेही जातील दुःखदिन।
येतील पुढे सुखाचे क्षण ।
तोवर संयमाचे पालन ।
मनापासोन करावे ॥ 13॥

येथ म्हणे श्री निसर्गरावो ।
कोरोना ना पसरावो ।
हाच हेतू मनी ध्यावो ।
जनकल्याणहेतूने ॥ 14॥
*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*