शोध

+3

शोध

सकाळीच सदाशिवचा फोन वाजला. झोपेतून कसाबसा उठला आणि फोन पाहिला तर त्याचे डोळे खाडकन उघडले. फोन घेऊन तसाच तो हॉलमध्ये आला. फोन उचलून तो बोलला,” बोला. पलिकडून फक्त एवढेच उत्तर मिळाले,” आज सकाळी दहा वाजता.” पण अहो हे कसे शक्य आहे. तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. खूप मोठी रिस्क असेल ही,” सदाशिव बोलत होता. ” मी तुम्हाला वेळ सांगितली आहे बाकीचे तुम्हाला माहितीच असेल असे बोलून फोन कट झाला. सदाशिव फोन ठेवण्यासाठी नंतर खोलीत आला तर सुरेखा त्याची बायको साखरझोपेत होती.त्याने पलंगाजवळ असलेल्या टेबलावर फोन ठेवला आणि तो अंघोळीसाठी गेला. सकाळीच फोन आल्याने तो थोडा बैचेन दिसत होता. तो फ्रेश होऊन आला तर सुरेखा खोलीत नव्हती. तो तिला आवाज देणार तितक्यात कोणीतरी त्याला पाठून पकडले. सदाशिवने वळून पाहिलं तर सुरेखाच होती. त्याला नाश्ता करायला बोलवायला आली होती ती. ” अगं, आताच सात वाजले आहेत. तू का बरे लवकर उठली?”, सदाशिवने तिला विचारले. ” असे काय म्हणताय? मला तुमच्या ऑफिसची वेळ माहिती आहे. आज जरा लवकर जाताय मग काय झाले? तुम्ही घरातून गेल्यावर तरी कुठे काम असते मला? त्यानिमित्ताने सकाळी तुमच्यासोबत वेळ तरी घालवला येईल,” सुरेखा उत्तरली. सदाशिवने काही बोलण्याचे टाळले आणि दोघेही हॉलमध्ये आली. सुरेखाने सगळी तयारी करून ठेवली होते. सदाशिव नाश्ता करणार तोच त्याने विचारले,” तू कधी खाणार?” “अहो मी दुसऱ्या बाथरूममध्ये जाऊन आवरून आले. पण देवपूजा झाली की, मी पण नाश्ता करेन,” ती म्हणाली.सुरेखा आतल्या खोलीत जाऊन तिच्या नवऱ्याचे सामान आणायला गेली. ती गेली याची खात्री पटताच सदाशिवने फोनवर व्हॉट्स अप ग्रुपमध्ये एक मेसेज पाठविला. जसा तो मैसेज ग्रुपमधील व्यक्तींनी वाचला इथून सदाने तो मेसेज काढून टाकला. तो मेसेजेस होता,” Sharp at 8am”. सुरेखाने रूमाल, वॉलेट, घडी आणि कारची किल्ली आणून दिली. सदाशिवने चहा संपवून ते सगळे घेतले आणि त्याची एक मध्यम आकाराची सुटकेस घेऊन निघाला. सुरेखाने दार लावून घेतले आणि देवपूजा करायला गेली. सदाशिव लगेच गाडीत बसला आणि ठरविल्याप्रमाणे त्याच्या इच्छित स्थळी जाऊ लागला. सदाशिव काही अंतरावर गेला असेल तर तिथूनच उजव्या दिशेने वळून तो एका पोलिस ठाण्यात शिरला. सुटकेस मात्र न विसरता आत घेऊन गेला. बरोबर अर्ध्या तासाने दोन पोलीस व एक महिला कॉन्स्टेबल त्या ठाण्यातून बाहेर पडले. एक पोलीस सदाशिवच्या कारमध्ये बसून पुढे गेला आणि कॉन्स्टेबल व दुसरा पोलीसनिरीक्षक त्यांच्या गाडीतून त्या कारच्या पाठोपाठ गेले. आता त्या दोन्ही गाड्या एका सोसायटीच्या बाहेर येऊन थांबल्या. आठ वाजत आले असल्याने सगळी ऑफिसला जाणाऱ्या मंडळींची घाई गडबड होती. पण त्या सोसायटीच्या आवारात असणाऱ्या मोठमोठ्या झाडांमुळे या दोन्ही गाड्या काही सहज नजरेत येत नव्हत्याच. कारमधील पोलीस आणि इतर दोघे ताबडतोब त्या सोसायटीच्या क्रमांक चारच्या इमारतीत शिरले. तिथे दुसऱ्या मजल्यावर एक नक्षीदार दरवाजा असलेल्या घराची बेल त्यांनी वाजवली.
त्या घरातून एका चाळीस वर्षीय बाईने दार उघडले आणि ती पाहतच राहिली. त्या तिघांनी आत येण्याची परवानगी घेतली आणि त्या बाईने दार बंद केले.
घरात पोलीस आले ही गोष्ट त्या बाईने आत जाऊन कोणाला तरी सांगितली आणि मध्यम वयाचे स्त्री -पुरुष बाहेर आले. ते दोघेही नवरा- बायको होते. एका पोलीसनिरीक्षकाने आपली ओळख सांगून ” श्रावणी” कोण आहे? असा प्रश्न केला. त्या माणसाने ती आपली मुलगी असल्याचे सांगितले. “मी राजन सबनीस आणि ही माझी पत्नी राधिका सबनीस. श्रावणी आम्हा दोघांची लेक आहे,” असे तो बोलला. ” अजून कोण राहत का तुमच्या सोबत?,” दुसऱ्या पोलिसांनी विचारले. ” माझा धाकटा मुलगा उदय पण सध्या तो हॉस्टेलमध्ये आहे,” राजन म्हणाला. ” आणि ज्यांनी दार उघडले त्या कोण,”? त्या पोलिसाने विचारले. ” त्या दुर्गा काकू.घरकामासाठी आमच्याकडे येतात. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने त्याला घरातून बाहेर काढले. मग आम्ही त्यांना आमच्या घरी राहायला सांगितले,” राधिका उत्तरली. महिला कॉन्स्टेबलने श्रावणीला बोलवायला सांगितले. आतमध्ये उभ्या राहिलेल्या दुर्गा काकूंनी तडक श्रावणीला बोलावले, जी कानात हेडफोन लावून गाणी ऐकत ऑफिसला जाणार होती. श्रावणी काकूसोबत बाहेर आली. महिला कॉन्स्टेबलने तिला पाहिले आणि एका ठिकाणचे नाव घेतले. ते ठिकाण होते ती कॉलेज करताना राहत असलेले हॉस्टेल जिथून ती दोन आठवड्यां-पूर्वी आली होती. राधिका ते ऐकून घाबरली कारण त्याच ठिकाणी काही अनोळख्या व्यक्तींनी हल्ला केला होता. काही मुलींना किरकोळ जखम झाली होती आणि श्रावणी व इतरजणी सुरक्षित होत्या. ” आम्ही तिथे ज्या व्यक्तींनी हल्ला केला होता त्याबद्यल चौकशी सुरु केली आहे . त्याच कारणास्तव काही मुलींकडून आम्ही या प्रकरणाची काही माहिती मिळते का ते पाहण्यासाठी विचारपूस करत आहोत. ज्या मुली तिथेच आहे त्यांची चौकशी झाली फक्त श्रावणी इथे आल्याने आम्ही तिचा पत्ता घेऊन इथे आलो आहोत. तुमची हरकत नसेल तर आम्ही तिला काही वेळेसाठी आमच्याबरोबर घेऊन जात आहोत,” ती महिला बोलून थांबली. राधिका व राजन शांतपणे एकमेकांना पाहत उभे होते. एखाद्या बाहुलीप्रमाणे दोघांनी फक्त होकारार्थी मान डोलावली. श्रावणी काही न बोलता निमूटपणे त्यांच्यासोबत जायला निघाली. पावसाळ्याचे दिवस असल्याने ढगांनी काळोख केला होता आणि पाऊस पण सुरू झाला. श्रावणीने तिच्या सवयीप्रमाणे स्कार्फ तिच्या चेहऱ्यावर गुंडाळून छत्री घेतली आणि ते सगळे तिच्या घरातून बाहेर पडले. श्रावणी कोठे जात आहे हे फक्त तिचे आईवडील आणि त्या काकूंना माहिती होते.
श्रावणी व महिला कॉन्स्टेबल सदाशिवच्या कारमध्ये बसले आणि निघाले. उरलेले दोघेही दुसऱ्या गाडीतून तिथून बाहेर पडले. आता गाडी नेहमीच्या रस्त्यावर आली होती. सकाळची वेळ असल्याने जास्त वाहनांची एवढी वर्दळ नव्हती. मघाशी ज्या पोलिस ठाण्यात सदाशिव गेला होता गाडी तिथे आली परंतु तिथे न थांबता पुढच्या दिशेला निघून गेली. श्रावणीच्या हातात तिचा फोन आणि छोटी पर्स होतीच जी तिने घरातून निघताना सोबत घेतलीच होती. आता दोन्ही गाड्यांनी आरे कॉलनीचा रस्ता धरला होता. तिकडची हिरवळ ही काही औरच होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडेच झाडे आणि पावसाळ्यात येणारे ते मोठ्या आकाराचे गवत. दोन- तीन बसस्थानके गेल्यानंतर तिथे जंगलाच्या रस्त्याला एक पायवाट होती जी सहजपणे दिसून येत नव्हती. दोन्ही गाड्या एका बाजूला थांबल्या आणि श्रावणी व इतर सगळे तिथून त्या वाटेने जाऊ लागले. पाऊस अजूनही कोसळत होता पण हळूहळू अगदी वाऱ्याच्या इशाऱ्यावर. पंधरा – वीस मिनिटांनी ते सगळे एका जीर्ण घरापाशी थांबले. त्या घराच्या दाराला कुलूप होते. एकजण पुढे गेला आणि किल्लीने ते कुलूप उघडून दार उघडले. जसे दार उघडले गेले आधी श्रावणी व ती महिला कॉन्स्टेबल आत शिरली आणि नंतर ते दोघेही. त्या घरात शिरल्यानंतर आतून दार बंद केले गेले.

आता सगळेजण घरात आले होते. एका पोलीस निरिक्षकाने त्या घराच्या मध्यभागी असलेला गालिचा बाजूला काढून ठेवला. गालिचा सरकवताच एक चौकोनी आकाराची सफेद फरशी दिसू लागली. त्याने आपल्या मजबूत हाताच्या पंजाने ती मधल्या बाजूने थोडी दाबून सरकवली. जशी ती फरशी सरकली तिथे आता एक तळघर दिसले. श्रावणी, ती महिला असे हे सारे एकेक करून त्या घरात शिरले. जरी ते तळघर असले तरीसुद्धा त्याच्या भिंतीवर असलेला शुभ्र रंग आणि लावलेल्या मोठ्या लाईटमुळे तिथे कुठेही अंधार नव्हता. चोघैही तिथे समोरून दुसऱ्या क्रमांकाच्या खोलीत शिरले. त्या खोलीत आधीच एक मध्यम उंची , कोट घातलेला आणि पाठ करून उभा असलेला इसम होता. इतका वेळ फोन घेऊन बसलेली श्रावणी आता पुढे आली आणि त्या व्यक्तीला सल्यूट केला व सोबतच आपली ओळख व नाव सांगितले,”ऑफिसर श्रावणी रिपोटिंग सर”!. तिचा आवाज ऐकताच त्या इसमाने मागे वळून तिच्या सल्यूटला प्रत्युत्तर देऊन त्या सगळ्यांना तिकडच्या खुर्चीवर बसायला सांगितले आणि तो इसमही बसला. त्या इसमाचे वय जेमतेम पंचावन्न असेल पण चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती. ” काय मग, आज पोलीस?,” इतरांना पाहून त्यांनी श्रावणीला प्रश्न विचारला.
” होय, सर. जर आज मी इथे येण्याची योजना तयार केली नसती तर कदाचित नंतरही जमले नसते”,श्रावणी बोलली. ” मला वाटते तू अजून थोडा वेळ थांबली पाहिजे होती, निदान?”, ती इसम काही बोलणार तिथेच श्रावणीने बोलण्यास सुरुवात केली. ” अजून किती सर? तुम्ही सांगितले म्हणून मी माझ्या हॉस्टेलमधून त्या घटनेनंतर लगेच इथे आले. पण आतासुद्धा तेच. मला नाही जमणार हे असे लपून राहणे. तिथे हॉस्टेलमध्ये जर मी थांबले असते तर कदाचित त्या हल्ला करणाऱ्यांना  पकडण्यात यश मिळाले असते. मी समजून त्याने माझ्या रूममेटवर वार करायचा प्रयत्न केला होता. तिने आत्मसंरक्षाणर्थ त्यांच्यावर प्रतिहल्ला केला म्हणून बाकीच्या जणींना किरकोळ जखमा झाल्या. हे करून पण ते पसार झाले आणि ती संधी मला हुकली. सर, फक्त तिकडचे एसीपी आणि तुमची जुनी मैत्री असल्याने हा हल्ला प्रसार माध्यमपर्यंत गेला नाही आणि त्यात हॉस्टेलचे नाव खराब होण्याच्या भितीने त्या हॉस्टेलचे ट्रस्टी पण शांत बसले. यानंतर पुन्हा जेव्हा आपल्या खबरीने एका आतंकवादी टोळीची बातमी दिली तिथेसुद्धा माझ्या जीवाला धोका म्हणून तुम्ही मला सिक्युरिटी दिली होती. तुमचे तिथे जाणे, तुम्हाला तिथेच गुंतवून ठेवणे आणि मग त्या शत्रूने मला शोधून ठार करण्यात आलेला त्यांचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी झाला आणि तुमचा बॉडीगार्ड मला वाचवताना मृत पावला. या सगळ्यांपासून लांब म्हणून तुमच्या आदेशानुसार मी इथे आले पण?”, असे बोलून श्रावणी शांत बसली. ” पण काय, ऑफिसर? वैष्णव सरांनी विचारले. ” मी इथे राहायचे तेव्हा माझ्या घरी येणारी माणसे म्हणजे पेपरवाला,गवळी, भाजीवाले यांची आणि माझ्या आईवडिलांची इतरांसारखीच ओळख होती. पण जेव्हा मी तुमची टीम जॉईन केली आणि इथे परतले त्यानंतर मात्र माझ्या घरी येणारी ती माणसेच सोडा, अगदी माझ्या वडिलांच्या ऑफिसबाहेर असणारा चहावाला पण बदलला; या मागचे कारण काय तर फक्त मला देण्यात येणारी सुरक्षा. मी माझ्यासाठी आणि घरात राहणाऱ्यांसाठी गार्ड ठेवायला नकार दिला तर सर तुम्ही अशा तर्हेने मला प्रोटेक्शन दिले. आजसुद्धा मी जर सदाशिवला बोलावून हे केले नसते तर मग मला या सर्व गोष्टी तुम्हाला सांगता आल्या नसत्या,” श्रावणी बोलली. वैष्णव सरांनी तिला पाण्याचा ग्लास दिला. आता ती फक्त त्यांना पाहत होती .
“मला तुझी परिस्थिती समजते पण मी पण काहीच करू शकत नाही. मी तुझ्या जीवाशी खेळू शकत नाही. तू इथे आहेस ते फक्त जिद्दीमुळे. जोपर्यंत आपण त्या आतंकवादी संघटनेच्या बॉसला पकडत नाही तोपर्यंत तरी मी तुला कोणत्याही प्रकारची हानी झालेली पाहू शकत नाही. आपल्या टीममध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे,” वैष्णव सर म्हणाले. वातावरण काही वेळेसाठी शांत झाले होते. कोणीच काही बोलत नाही हे पाहून पोलिसांचा युनिफॉर्म घालून बसलेला सदाशिव उठला आणि सरांच्या जवळ येऊन कानात काहीतरी कुजबुजला. “श्रावणी,तुझ्या योजनेनुसार तू इथपर्यंत आलीस तिच खूप मोठी बाब आहे. पण आता तुम्ही सगळे निघा आणि व्यवस्थित श्रावणीला घरी सोडून या,” जरबी आवाजात सर बोलले. श्रावणी उठली आणि बोलली,” सर, मला फक्त एकदाच संधी द्या. मी त्या सगळ्यांना पकडून तुमच्या समोर आणते. असे घरात बसून मी हे प्रकरण नाही हाताळू शकत. या पूर्वी मी याच संघटनेच्या आधीच्या बॉसला पकडले होते आणि आपल्या सरकारने त्याला फाशीची शिक्षा दिली होती. त्यानंतर आलेला हा नवीन  बॉस त्याचा बदला घेण्यासाठी मला शोधत आहे. माझ्या आय डी कार्डवर चुकून शांभवीने एका वेगळे नाव लिहिले होते आणि माझा अगदीच जुना फोटो लावला गेला होता. मी मात्र नंतर ते सगळे बदलून वेगळे कार्ड बनविले पण ते कार्ड माझ्याजवळच ठेवले होते. आता नेमके तेच चुकीचे कार्ड त्या माणसांनी हॉस्टेलमधून चोरले आणि ते नाव व चेहरा असणारी मुलगी ते शोधत फिरत आहेत”, ती उत्तरली. “सर, आपण एकदा श्रावणी जे बोलत आहे त्यावर चर्चा करू आणि त्या बॉसला पकडू,” सदाच्या बाजूला बसलेली शांभवी बोलली.
दोन तास त्या खोलीत चर्चा झाली आणि शेवटी शांभवी,अवधुत,सदा, श्रावणी आणि वैष्णव सरांनी एक मोठा सापळा रचला. यामध्ये फक्त हे पाचजण नसून गरज पडल्यास पोलीस, खबरी आणि इतर माणसे सामावून घेतली होती. आता श्रावणी व इतर तिघेही निघत असताना वैष्णव सरांनी सगळ्यांना एकमेकांच्या संपर्कात चोवीस तास राहायला बजावले. कोणतीही छोटी हालचाल जाणवल्यास इतरांना खबर देऊन सावध करायला सांगितले. श्रावणीने खूप विनंत्या केल्या पण तिची सिक्युरिटी जशी होती तशीच राहणार होती व तिला कुठेही जाताना स्कार्फ, तिचा स्वतःचा फोन आणि स्मार्टवॉच घालायला सक्ती करण्यात आली. सदाशिव व इतर सगळे उठले तोच मिश्कीलपणे सर बोलले,” तुम्ही तिघेही या युनिफॉर्ममध्ये हुबेहूब पोलिसच दिसता.” सर, ते दोघे तर राहू दे, शांभवीचा खणखणीत आवाज ऐकून ती माझ्याच वयाची आहे हे कोणी सांगूही शकणार नाही. माझे आईबाबा तिने जे सांगितले,विचारले याची निवांत उत्तरे देऊन शांत बसले होते,” श्रावणी बोलली. सगळ्यांनी एकमेकांना पुढची भेट कशी व केव्हा हे सांगून निघाले. ठरलेल्या पद्धतीने शांभवीने श्रावणीला घरी सोडले आणि सगळेजण आपापल्या कामाला गेले.
वैष्णव दत्त हे एटीएसचे प्रमुख होते. आपल्या देशात होणारी प्रत्येक हालचाल, येणारी अनोळखी व्यक्ती, आधीचे झालेले हल्ले हे पाहता प्रत्येक राज्यात एक टीम त्यांनी बनवली होती. त्या सगळ्यांशी ते नेहमीच संपर्कात असत. प्रत्येक टीमला लीड करणारा एक ऑफिसर होता, व हे सर्व काम अगदी गुप्तपणे पार पडत होते. सौ. संजीवनी दत्त आणि त्यांचा मुलगा क्षितिज या दोघांना या गोष्टींबद्दल माहिती होती. साहजिकच हे दत्त यांचे कुटुंब होते. संजीवनी आणि या एअरफोर्समध्ये होत्या आणि क्षितिज आर्मीमध्ये होता. श्रावणी या टीममध्ये तिच्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात रूजू झाली होती पण खूप कमी वेळात तिने बजावलेली कामगिरी यामुळे तिला या टीमला लीड करायला मिळाले होते. स्वतः सदा आणि इतरांनी देखील दत्त सरांना ही जबाबदारी तिला देण्यास सुचविले होते. पण जेव्हा दत्त यांना महाराष्ट्रात आतंकवादी लपून काहीतरी कट करणार अशी बातमी मिळाली तेव्हा मात्र त्यांनी या कामगिरीवर श्रावणी व तिच्या टीमला नियुक्त केले. परंतु एकदा श्रावणी, इतरांसोबत एका संशयित ठिकाणी गेली तिथे मात्र त्या आतंकवादी संघटनेचा बॉस आणि काही साथीदार  झालेल्या चकमकीत ठार झाले आणि त्यानंतर त्या संघटनेने दुसरा बॉस बनविला आणि ते श्रावणीचा शोध घेत होते ते फक्त तिला संपविण्यासाठी. वैष्णव सरांचे कुटुंब सोडले तर इतरांच्या घरी त्यांच्या या कामाबाबत काहीच माहिती नव्हते. दत्त सरांनी तशी चोख व्यवस्था करून ठेवली होतीच.
घरी पोहोचल्यावर श्रावणीने पोलिसांना मी त्या घटनेवेळी तिथे नव्हते कारण प्रोजेक्टसाठी काही सामान आणावयाचे होते. मी व अजून दोघी अशा मिळून आम्ही ते आणायला गेलो. त्यानंतर तिथे हॉस्टेलमध्ये ती घटना घडली. एका प्रकारे हे सत्यच होते पण श्रावणीने ती आज नेमकी कुठे होती याची वाच्यता केली नाही. बारा वाजून गेले असल्याने श्रावणी आज तिच्या ऑफिसला गेली नाही. परंतु ती जेव्हा कुठे जायची तिला ते दत्त सरांना सांगावे लागत असे. मग ते काही माणसे तिला सिक्युरिटी म्हणून पाठवत ते पण वेशांतर करून. दिवस असेच वरचेवर जात होते. टीव्हीमध्ये काही अशा वेगळ्या बातम्या दिसत नव्हत्या. घर ते ऑफिस असाच दिनक्रम चालू होता श्रावणीचा आणि इतर सदस्यांचा. दोन महिन्यातून एक अशी भेट ठरलेली असल्याने आता पुन्हा दोन महिन्यानंतर ती सरांना व इतरांना भेटणार होती. तोपर्यंत श्रावणी नवीन बॉसबद्यल माहिती, त्याचे सध्याचे वास्तव्य, सहकारी अशी कोणती खबर हाती लागते याची वाट पाहात होती.
नवरात्रीचे दिवस सुरू होणार होते. भारत हा विविधतेने नटलेला देश असून इथे प्रत्येक प्रांत,राज्य हा सण आणि उत्सव आपापल्यापरीने साजरा करत असतो. याच संधीचा जास्त फायदा हे आतंकवादी करतात ही जाणीव सगळ्यांना होती आणि तशीच योग्य दक्षता घेतली जात होती. एकदा सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला निघत असताना श्रावणीचा विश्वासू आणि इमानदार माणूस तिथे सोसायटीच्या गेटबाहेर उभा होता. जशी ती गेटजवळ पोहोचली तिने त्याला ओळखले. ती थोडी जवळ जाणार तोच मागून तिचे वडील कार घेऊन आले आणि तिला ऑफिसपर्यंत सोडायला गेले. फोनवर असे संभाषण करणे धोक्याचे असू शकते म्हणून ती कधीच त्या माणसांशी फोनवर बोलत नसे. पण जोपर्यंत काही महत्त्वाची सुई मिळत नसे तोपर्यंत ती माणसेदेखील तिला संपर्क करत नसत. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर श्रावणीने हा प्रकार दुसऱ्या फोनवरून वैष्णव सरांना कळविला.दिवसभर तिने स्वतःची कामे उरकून थोड्या वेळेआधीच निघाली. ती राहायची त्या सोसायटीआधीच्या वळणावर देवीचे सुंदर आणि कोरीवकाम केलेले प्रशस्त मंदिर होते. देवीच्या प्रतिमेला नमस्कार करून तिथे थोडा वेळ एका बाजूला बसली. काही वेळानंतर तिथे एक भिकारी आला. श्रावणीने तिच्या पर्समधून काही पैसे देऊ केले तर त्याने ते घेण्यास नकार दिला. तिने मग त्याला तिच्याजवळचा एक बिस्कीटचा पुडा दिला आणि मग तो निघून गेला.तो गेला त्याच्या विरुद्ध दिशेने आता श्रावणी निघाली. हा सगळा प्रकार म्हणजे तिचा विश्वासू माणूस नेमका कोठे आहे हे सांगायची खूण. तो भिकारी ज्या दिशेने जाईल त्याच्या विरूद्ध दिशेला तो विश्वासू माणूस असायचा. तो भिकारी, ते पैसे आणि बिस्कीट देऊ करणे हे आधीच ठरलेले होते. वीस मिनिटे चालून श्रावणी एका तुटलेल्या घरापाशी थांबली. आज तिच्या गेटजवळ आलेला हाच तो माणूस होता. तिने थोडा अंतर राखून फोन बाहेर काढला, तो सायलेंट मोडवर ठेवून कानाला लावत त्याला न पाहता विचारले,” मुलांची काही खबर? घरमालक आला की नाही? “. तो पण दुसरीकडे पाहत उत्तरला,” सात मुले आली आहेत. मालक जरा कामात अडकले आहेत. काजू,बदाम आणि मेव्याचा बंदोबस्त करायला आणि ते इथे आणायला त्यांना कोणी मिळाले नाही अजून. जमल्यास बाकीची मुले मेवा नाहीतर मिठाई तर नक्कीच आणतील.” एवढे बोलून तो तिथून निघून गेला. श्रावणीला तिला अपेक्षित असलेला दोरा सापडला होता. ती ताबडतोब तिथून घरी परतली. मघाशी झालेला संवाद ही सांकेतिक भाषा होती. मुले म्हणजे साथीदार, मालक म्हणजे त्यांना सूचना देणारा , काजू आणि मेवा ही शस्त्र तर मिठाई म्हणजे ग्रेनेड आणि बॉम्ब बनवायचे साहित्य. ही एक मोठी व्यूहरचना होती. सातजण आले होते आणि बाकीचे येण्याच्या तयारीत. ही माहिती जशीच्या तशी श्रावणीने तिच्या वेगळ्या फोनवरून दत्त सरांना दिली. अशाच प्रकारची थोडी माहिती दत्त यांना मिळाली होती ती अशी की, काही अनोळखी माणसे मुंबईत दाखल झाली होती. एकाने तर दुकानात वेगळ्या रंगाची आणि भाषेची नोट दुकानदारास देऊ केली. एकतर हि योजना नवरात्रीच्या आठवड्यात अथवा शेवटी अंमलात येणार हे समजले होते. पण नेमके या कटात किती जणांचा सहभाग होता हे काही कळलेच नव्हते. वैष्णव सरांनी खूप विचार करून पुणे आणि नाशिकमधील टीमला मुंबईत तातडीने बोलावून घेतले. नवरात्र सुरू होण्यास पाच दिवस शिल्लक होते. आज पुन्हा श्रावणीने इतरांसोबत जाऊन वैष्णव सरांची भेट घेतली पण यावेळी ते एका गार्डनमध्ये भेटले. श्रावणीप्रमाणे इतरांनीसुद्धा स्वतःचा चेहरा ओळखता येणार नाही अशी वेशभूषा केली होती. वैष्णव सर चक्क भेळपुरी विकणाऱ्या माणसासारखे गळ्यात दोर बांधून त्यात सगळे असणारे जिन्नस घेऊन तिथे पोहोचले. ते चौघांसोबत थोडसं बोलले आणि त्यांनी प्रत्येकाला भेळपुरी देऊन तिथून गेले. वेळ न दवडता ते सगळे वेगवेगळ्या वाटेने निघाले. सदाशिवसोबत त्याचा साथीदार आणि शांभवी व श्रावणी असा गट पाडून ही मोहीम फत्ते करण्यात येणार होती. पुणे आणि नाशिकच्या टीमचे इथे येणे आणि सर्व हालचाली पाहण्यापासून बाकीचा मजकूर त्या भेळच्या कागदात ठेवलेल्या चीपमधून वैष्णव सरांनी त्या चौघांना दिला होता. एखाद्या वेळी गरज पडेल म्हणून क्षितिजसुद्धा सुट्टी घेऊन मुंबईत आला होता. सुट्टी फक्त नावाचीच, खरतरं तो हा कट उधळून लावण्यासाठी सज्ज होता.
उद्या नवरात्रीचा पहिला दिवस सुरू होणार होता. पुणे टीमचे सगळेजण श्रावणीच्या संपर्कात होते तर नाशिक टीम ही क्षितिजसोबत को- ऑर्डीनेट करत होती. दिवसभरात काहीच झाले नसल्याने आता वाट रात्री होणाऱ्या गरब्याच्या कार्यक्रमाची होती. पोलीस बंदोबस्त तर आधीच केला गेलेला पण तरीसुद्धा कधी,कुठे काय होईल हे सांगता येणे शक्य नव्हते. श्रावणी तिच्या सोसायटीच्या ग्राऊंडमध्ये गेली आणि तिथे टीमसोबत नाचण्याच्या बहाण्याने बोलून घेतले. एक रात्र पूर्ण झाली होती. दुसरा दिवस उजाडला आणि सदाशिवला एक महत्त्वाची बातमी मिळाली. शांभवीच्या घरापासून दोन तासांच्या अंतरावर एक जीर्ण आणि पडकी चाळ होती. तिथे काही अनोळखी व्यक्तींचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली आणि तो त्याचे साथीदार आणि काही ओळखीच्या पोलिस मित्रांना घेऊन सहजच गेला. तिथे जाताच सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या. दहा- बारा माणसे तिथे काहीतरी काम करीत होती. त्यांचा चेहरामोहरा, कपडे, बोलण्याची पद्धतही आपल्या लोकांपेक्षा निराळीच होती. सावधगिरीने त्यांनी पाहणी करून तिथे काही वाहिद नावाचा त्याचा खबरी व इतर माणसे नजर ठेवण्यासाठी नेमून ते परतले. सदाशिवने तिकडचे काही फोटो आणि विडियो वैष्णव सरांना व्हॉट्स अपला पाठवून लाईव्ह लोकेशन योग्य रितीने दिले. अजून सात दिवस शिल्लक राहिले होते नवरात्रउत्सव संपायला. वैष्णव सरांनी क्षितिजच्या मदतीने नाशिक टीमला कोणतीही माहिती न वगळता एक सोडून तीन विविध प्रकारची योजना आखण्यास सांगितली.
१. आतंकवाद्यांना पकडणे.
२. त्यांची योजना धुळीस मिळवणे.
३. कोणतीही जीवितहानी टाळणे.
योजनेची आखणी करण्यात आली होती आणि जर अधिक मनुष्यबळ लागलेच तर दत्त सरांनी मुंबईतील त्यांचे एसीपी मित्र श्री. राजीव मुकादम यांना या गोष्टीची पूर्वसूचना दिली होती. सदाशिवने त्या चाळीच्या आसपास जी माणसे पाळत ठेवायला नेमली होती त्यातील एकाची आणि त्या आतंकवाद्यांपैकी एका व्यक्तीची अनावधानाने टक्कर झाली. तो त्याची पिस्तूल बाहेर काढणार तिथूनच मागून वाहिद आला आणि त्याच्या मानेजवळच्या भागावर हाताने वार केला. असे केल्याने तो लगेच बेशुद्ध पडला आणि त्याला लगेचच एका गाडीत बसवून त्या ठिकाणापासून खूप दूर नेण्यात आले. हे सगळे एवढ्या लवकर घडले की, त्या आतंकवाद्यांपैकी कोणीही तोपर्यंत बाहेर आला नाही. त्याच दिवशी रात्री क्षितिज हा वाहिदने पकडून आणलेल्या माणसाला बघायला गेला. आपल्या वडिलांप्रमाणे तोही ओळखू येत नव्हता अशा पद्धतीने तिथे आला. क्षितिज तिथे गेला तेव्हा ती व्यक्ती झोपून होती. पण खरंच झोपून आहे की, सोंग करत आहे याची शाश्वती नसल्याने तो पूर्णपणे तयार होऊन त्याची फुली लोडेड  पिस्तूल घेऊन आला. क्षितिजच्या अंदाजानुसार ती व्यक्ती झोपेचे सोंग घेऊन कोणी येण्याची वाट पाहत होती आणि नेमका क्षितिजची चाहूल लागताच त्याने क्षितिजवर हल्ला चढविला. क्षितिज सावध असल्याने त्या माणसाचा हात पकडून त्याला पाठीवर वळवून गुडघ्यावर बसायला लावले. यामध्ये काही वस्तू पडल्याचा आवाज झाला तसाच तोंड झाकून वाहिद तिथे आला. तिकडची परिस्थिती पाहून तिथे काय झाले ते तो समजला आणि त्याचा रुमाल बाहेर काढून त्याने व क्षितिजने त्या माणसाला जवळच्या खुर्चीवर बसवून त्याला रश्शीने बांधले व रुमालाने त्याचे तोंड बंद केले जेणेकरून तो काही आवाज करू शकणार नाही आणि कानाजवळ क्षितिजने हाताने वार करून त्याला पुन्हा बेशुद्ध केले .वाहिदने त्याच्या खिशातून एक रिकामी काचेची बाटली काढली व क्षितिजने त्यात सैंधव मीठ आणि साध्या मीठापासून बनविलेले सफेद रंगाचे काही खडे टाकून ठेवले. ती बाटली एका छोट्या टेबलावर ठेवून त्यावर एक कागद लावला ज्याच्यावर NaCN असे ठळक अक्षरात लिहिले होते. NaCN म्हणजे सोडियम सायनाईड जे एक प्रकारचे विषच आहे.
काही वेळाने ती बेशुद्ध व्यक्ती उठली तर बाजूला क्षितिज उभा दिसला. क्षितिजने त्याला तो कोण आहे, कुठून आला अशी विचारणा केली पण तो मात्र काहीच उत्तर देत नव्हता. खूप प्रयत्न करूनही तो काहीच बोलत नाही म्हणून शेवटी क्षितिजने वाहिदला थोडे लांब नेले आणि ती काचेची बाटली जिथे त्या व्यक्तीला बांधून ठेवले होते तिथे हाताने इशारा करून “सायनाईड” असे थोडे मोठ्या आवाजात बोलला जे त्या व्यक्तीने ऐकले. त्याच्या हाताची रश्शी तो शुद्धीत येण्यापूर्वी थोडी सैल करून ठेवली होती. जसे त्या व्यक्तीने तो शब्द ऐकला तो स्वतःला मोकळा करून लगेच त्याने बाटलीला हातात घेतले आणि ती तोंडाला लावली. साहजिकच त्यात मीठाचे खडे होते. ती पूर्ण बाटली रिकामी करून त्याने फेकली आणि हसू लागला. परंतु तो मेला नाही उलट असे मीठ खाल्ल्याने त्याला ओकारी येऊ लागली. दोन तासांनी तो जरा ठीक झाला. क्षितिजने आता त्याच्या डोक्यावर पिस्तूल ठेवले आणि वाहिदने सुरा त्याच्या गळ्याला लावला. त्या व्यक्तीने शरणागती पत्करली व नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या हल्ल्याबाबत त्याने सर्व सांगितले. पहिल्यांदा तो काय बोलत होता ते समजत नव्हते मग कळाले तो जी भाषा बोलतो ती नूरिस्तानी आहे. इराणच्या देशात अशी भाषा बोलली जाते. संयोगाने या भाषेची जाण असणारी एक व्यक्ती वाहिदच्या ओळखीची आणि तिथे बाहेर त्याची साथीदार म्हणून होती.वाहिदने त्याला फोन करून आत बोलावले आणि तो जे बोलला ते समजावून क्षितिजला सांगितले. दसऱ्याला हे सगळेजण मिळून गोळीबार करणार होते आणि काही मोठ-मोठ्या बिल्डिंग उडवून लावणार होते.
क्षितिजने बाहेर जाऊन ही बातमी दत्त यांना दिली आणि तिथूनच मग श्रावणी व पुण्याची टीम मिळालेल्या माहितीनुसार त्या चाळीत गेले आणि त्या सगळ्यांना पकडून आपल्या ताब्यात घेतले. पण एक व्यक्ती अजूनही बेपत्ता होती. आता दसऱ्याच्या दिवसाची वाट बघणे गरजेचे होते. इथे त्या माणसाने सांगितलेल्या वर्णनानुसार त्या बेपत्ता माणसाचे चित्र बनविले गेले आणि ते श्रावणीला पाठविण्यात आले. दसऱ्याच्या रात्री हे सगळेजण ती व्यक्ती येण्याची वाट पाहत होते. जेव्हा रावणाला जाळण्यात येणार तिथे एक व्यक्ती मुद्दाम काहीतरी मोठे सामना घेऊन पुढे जाऊ लागला तोच क्षितिजने आणि श्रावणीच्या माणसांनी त्याला पकडून दुसऱ्या बाजूला नेले. हा माणूस तो दुसरा बॉस होता जो श्रावणीला शोधत होता. तो श्रावणीला मारणार तोच क्षितिजने त्याला मारून टाकले आणि एक मोठा हल्ला होण्यापासून सगळ्यांना वाचविले. अशा तर्हेने श्रावणीचा शोध घेणारा शेवटी यमसदनी पोहोचला व श्रावणी पुढच्या मोहिमेवर रूजू झाली.

………………………………समाप्त……………………………

+3

विध्वंस

शोध