वास्तुशांत

वास्तुशांत
हि बर्‍याच वर्षापुर्वीची गोष्ट आहे,हि घटना सत्यघटनेवर आधारित आहे,आम्ही तेव्हां इंदोरला राहात होतो,त्या वेळेस मी लहान होते,पण घटना लक्षात राहाण्या इतकी मोठी होते,आमचे वडील बँकेत नोकरी करित असल्यामुळे त्यांची तीन तीन वर्षाला दुसर्‍या गावी बदली होत असे,
वडिलांची बँकआमच्या घरापासुन बरिच लांब होती ,घर भाड्याचे होते,आमचे मालक आम्हीं असे दोघेच त्या त्या घरात राहात होतो,घराच्या अंगणात कुंपणाच्या मधुन एक आंब्याचे भले मोठे झाड होते,त्या झाडाला दरवर्षी उन्हाळ्यात खुप कैर्‍या लागत असे,व नंतर खुप आंबे खायला मिळत असे,झाड अतिशय भव्य व पसरलेले
होते,त्याच्या फांद्या आमच्या खिडकीत यायच्या,
आम्ही त्या फांद्या मालकाला तोडायला कितीवेळा सांगितले,पण त्या गोष्टीला त्यांनी नकार दिला,ते म्हणाले हे झाड एवढे भरलेले असल्याने ते तोडता येणार नाही,किंवा फांद्या पण तोडायच्या नाही,त्यामुळे आम्ही फांद्या तोडायचा विचार सोडुन दिला,
आमचे मालक आणि आमचा संबंध चांगला होता,आमच्या घराच्या मागच्या बाजुला दुसरे घर होते,त्यांचे आडनाव ढोलकीया,मारवाडी कुटुंब,
ढोलकीयांचा सोन्या चांदीचा व्यवसाय होता
आमच्या तीन घरात चांगला घरोबा होता
आम्हीं सर्व मुलं एकत्र खेळायचो,त्यांच कुटुंब मोठ असल्यामुळे त्यांना घर लहान पडायचं,आमच्या पुढच्या अंगणातला शेजारचा प्लाॅट कितीतरी वर्षापासुन रिकामा पडला होता,त्यांनी ती जमीन घर बांधण्या करिता घ्यायची ठरवली,
पण एक अडचण होती,आमच्या कुंपणाच्या मध्ये जे आंब्याचे (बहरलेले)झाड होते,त्याचा अर्धा भाग त्यांनी विकत घेतलेल्या जमिनीत येत होता,त्या मुळे ते झाड अर्धे पाडणे किंवा त्याच्या फांद्या तोडाव्या लागणार होत्या,ते झाड आमच्या घरमालकाचे होते,ढोलकियांनी फडणीस आमच्या मालकांच आडनाव फडणीस,
ढोलकीयांनी फडणीसांना झाड तोडण्या बद्दल विचारले,किंवा फांद्या तोडायची तरी अनुमती द्यावी असे सांगीतले,
पण फडणीस काकांनी सर्व गोष्टींना नकार दिला,व म्हणाले “दरवर्षी हे झाड फळांनी बहरते,ते झाड कधीच तोडु नये” असे मला मनापासुन वाटते, आम्हीं एवढी झाडाची निगा राखतो,त्या मुळे कुठलेही झाड तोडायचे म्हणजे मनाला न पटणारी गोष्ट आहे,तेव्हा हा विचार सोडुन द्या व जरा पलिकडुन घर बांधायला सुरुवात करा
पण ढोलकिया काका मारवाडी ते एवढीशी जमीन वाया घालवायला तयार नव्हते,शेवटी शेजार धर्म व आयुष्यभर शेजारिच रहायचे व संबंध बिघडायला नको म्हणुन मालकांनी दु:खी मनाने त्यांच्या हद्यित येणार्‍या फांद्या तोडायला परवानगी दिली,लगेच सुताराला बोलावुन ढोलकिया काकांनी झाडाच्या फांद्या कापायला सुरुवात केली,फांद्या कापल्या जात असतांना फडणीस काका व
त्यांच्या परिवाराला अतिशय दु:ख होत होते,कारण वर्षानुवर्ष त्या झाडाला कोणी अशा रितीने हात लावला नव्हता,आपल्या कडे असे म्हणतात कि बहरलेल्या झाडाला कधी तोडु नये,नाही तर ते झाड शाप देते,हि गोष्ट नंतर काही अंशी खरी ठरली,असो
इकडे झाडाच्या फांद्या तोडायला सुरुवात
झाली,आणि तुम्हाला खोट वाटेल पण त्याच दिवशी ढोलकिया काकांना अर्धांगवायुचा झटका आला,फांद्या तोडुन झाल्या,पण ढोलकिया काका अंथरुण धरुन बसले,आता सोन्या चांदीच्या पेढीवर त्यांचा मुनीम बसायला लागला,त्यांची मुलं मोठी होती पण पेढीवर बसण्या इतकी जाणकार नव्हती,
हळु हळु घर बांधायला सुरुवात झाली,एक एक भिंत चढायला सुरुवात झाली,पण ज्यांना मोठ्या घरात राहायला जायची मनापासुन अतिशय हौस होती ते ढोलकिया काका आपले घर बांधणे कुठपर्यत आले ते बघण्यास ऊठुन जाऊ शकत नव्हते,
हळु हळु घर बांधुन तयार झाले,चांगला दुमजली बंगला तयार झाला,पण एवढ्या अवधित ढोलकिया काकांची तब्बेत ढासळली,आता तर ते बसुपण शकत नव्हते,लोक म्हणायचे झाडाने त्यांना शाप दिला,बंगला सुंदर तयार झाला होता,आता वास्तुशांत करायची, पण मुहुर्ताचा घडा कोण ठेवणार?कारण पुजेला जोडप्यांनी बसायचे असते,पुजेला त्यांच्याच नातेवाईकांन पैकी कोणीतरी जोडपे बसायचे ठरले,शेवटी तो दिवस उजाडला,
पण दैवाची करणी पहा,सकाळपासुन घरात गडबड चालची होती,पण काकांना व पर्यायाने काकुंना त्या सुखापासुन वंचित राहावे लागत होते,काकांना सोडुन काकु कुठे जाऊ शकत नव्हत्या पण मुलांकरिता त्यांनी आनंदाचा बुरखा पांघरला होता,नविन घरात वास्तुशांतीचे विधी सुरु होते,काकांना पण नविन कपडे घालुन निजविले होते,पाहुण्यांनी घर भरले होते,काकुंना काकांचे सर्व पलंगावर करावे लागत होते,
मुहुर्ताची वेळ जवळ आली,नविन घरात मुले व नातेवाईक आधिच गेले होते,फक्त काकु काकांन जवळ होत्या,पुजा सुरु झाली काकांना मुहुर्ताच्या वेळी नविन घरात उचलुन आणायचे असे ठरले,इकडे पुजा सुरु असतांना काकांना अस्वथ्य वाटायला लागले,व काकांची शुध्द हरपली,त्याच वेळेस इकडे मुहुर्ताचा नारळ,देव,आणि वास्तुची प्रतिमा ते सर्व जिथुन एक फर्शी काढली होती त्या खड्यात ठेवायला सांगितले,मंत्रोचार मोठ मोठ्याने होत होते,
सर्वांनी विचार केला की आता काकांना नविन घरात आणायला हरकत नाही,पण इकडे काकुच त्या लोकांना बोलवायला निघाल्या होत्या,कारण ज्या वेळेस वास्तुची प्रतिमा खड्यात ठेवली त्याच वेळेस काकांचे प्राण अनंतात विलीन झालेले होते,काकींनी जोराचा हंबरडा फोडला,पण तिथे त्यांची किंकाळी ऐकायला कोणी नव्हते,
मन खंबीर करुन त्या ऊठल्या,व नातेवाईकांना बोलावुन आणले,काकिंना समोर बघुन सर्व जण म्हणाले आता काकांना आणायला जातो,तेव्हा काकु म्हणाल्या आता कसले ते घर बघताहेत,ते तर कधीच प्रभुला भेटायला निघुन गेले,
हे ऐकल्या वर सर्व जण जुन्या घराकडे धावले,ज्या नविन घरात काका हौशेन चालत येणार होते तिथे ते तिरडी वर आले जिथे थोड्या वेळापुर्वी आनंदाचे वातावरण होते तिथे दु:खाची छाया पसरली,नंतर त्यांचा अंतविधी करण्यात आला,काका गेल्यावर नविन घरात ढोलकिया कुटुंब राहायला आले नाही व ते घर तसेच पडुन राहीले ……!!!!!
समाप्त

अंजली देशपांडे
नाशिक