दत्तक

कथेचे नाव-दत्तक (स्पर्धेसाठी)
मृदुला बिल्डिंगच्या गेटवर स्कूलबसची वाट पाहत उभी असते.तिची मुलगी अचला शाळेतून येणार असते.तेवढ्यात तिला तिची काॅलेजची जुनी मैत्रीण संपदा दिसते.
“संपदा….संपदा….”
“अगं मृदुला; तु..?..किती दिवसानी भेटतेस”
“तू इथेच राहातेस?”
“हो लग्न करून मी मुंबईहून पुण्याला गेले होते.ह्यांची बदली झाली होती.आता पुन्हा मुंबईत आलो.”
“वा! आता बर झालं मग ,आपल्याला भेटताही येईल.”
तेवढ्यात स्कूलबस येते.अचला बसमधून उतरते.
“ही माझी मुलगी अचला.”
“वा! फार गोड मुलगी आहे.”
“अगं; मी इथेच काय बोलत उभी राहिले.चल घरी चल ना”
मृदुला संपदाला घेऊन तिच्या घरी येते. मृदुलाची मुलगी अचला आपल्या गोड गोड बोलण्याने संपदाला आपलंस करते.संपदाला ती फार आवडते.
“अचला..फार छान नाव आहे तुझ्या मुलीचं आणि आहे ही फार छान ”
“बाकी तुझ्या मुलांबद्दल काय बोलली नाहीस.”
“अं. .लग्नाला खूप वर्ष झालीत. तरी अजून मुल नाही झालं.खूप प्रयत्न केले.”
“ओ. .साॅरी हा, पण डाॅक्टर काय म्हणतात?”
“डाॅक्टर बोलतात तुला मुल होऊ शकत नाही.तुम्ही दत्तक घ्या.”
“अगं मग दत्तक घे ना ;तेवढं तुम्हालाही बरं वाटेल आणि ..”
“मिस्टर दत्तक घेण्यास तयार आहेत पण मलाच नाही आवडत.अगं आपलं मुल ते आपलं असतं.असं कोणत्याही दुसय्रा मुलाला आपण कसं आपलं प्रेम देणार?”
“अगं संपदा तु असं कसं बोलतेस. त्यालाही आई वडील नसतात.त्यालाही प्रेमाची गरज असते.जर तु एखादं मुल दत्तक घेतलं तर तुम्हालाही मुल मिळेल आणि त्यालाही आई वडील मिळतील.”
“तुला कळणार नाही माझं दु:ख; तुला मुलगी आहे ना.ज्याना मुल नाही त्यांची व्यथा तुला कशी समजणार”
“अगं; त्यात काय समजायचं? आता मुल होणं शक्यच नाही तर तुम्ही काय करणार? कायम असं निरस आयुष्य जगण्यापेक्षा एखादं मुल दत्तक घेतलं तर तुमच्या जीवनात किती आनंद निर्माण होईल.हे बघ तु माझं ऐक.एखादं बाळ दत्तक घे आणि बघ आई बनून.किती तृप्त बनून जाशील तु:
“अगं बोलणं सोपं असतं.करणं कठीण असतं.तुला नाही समजणार.”
“मी एक सांगू तुला; अचला माझी खरी मुलगी नाही आहे.आम्ही तिला दत्तक घेतली आहे.”
“काय?”
“हो,माझी परिस्तिथी तुझ्यासारखीच होती.चार -पाच वर्ष किती उपाय केले,वाट पाहिली आणि मग शेवटी अचलाला दत्तक घेतलं आणि जीवन इतकं सुखमय होऊन गेलं की विचारू नको.हे बघ आपलं मुल,स्व:ताचं मुल हे सर्व तु आधी डोक्यातुन काढून टाक.असं काही नसतं.त्या मुलानाही आई वडील नसतात.आपल्यालाही मुल नसतं.मग आपणच नाही का त्यांचे आई वडील.तेच आपलं मुल नाही का.प्रेमामध्ये कोण स्व:ताचं,दुसय्राचं असं काही नसतं. अजुनही वेळ गेलेली नाही आहे.तु एखादं मुलं दत्तक घे.”
“मृदुला,तु माझे डोळे उघडलेस.मी उगाचच काहीतरी विचार करत होते.माझे मिस्टर मुल दत्तक घ्यायला तयार होते. पण मी नकार दिला तेव्हा आमच्या सहजीवनावरही याचा परिणाम झाला.आता माझा दत्तक घेण्याचा निर्णय ऐकून हे किती खुश होतील.तुमचं माय-लेकीचं गोड,निरागस नातं पाहून मी धन्य झाले. अचला मला खूप आवडली.मी अचलासारखीच एक गोड मुलगी दत्तक घेणार आणि तिला खूप खूप प्रेम देणार.”
मृदुलाच्या अचानक भेटीने संपदाच्या मातृत्वाचे दरवाजे उघडले गेले आणि आपल्या मैत्रिणीचे हरवलेले मातृत्व तिला शोधून दिल्याने मृदुलाचे मन तृप्त झाले.

-सुप्रिया तेंडुलकर-