अहंकार 2

**** अहंकार ****
एका गावात एक शिल्पकार होता, खूप अप्रतिम मूर्ति बनवायचा, दूर-दूर गावातून त्याच्या मूर्ति पाहायला लोक यायचे. एकदा त्याची भेट एका साधुशी झाली आणि साधुनी त्याला सांगितले कि, “तुझा मृत्यू जवळ आला आहे, 15 दिवसांनी यमदूत तुला घेउन जातिल”.
साधुची भविष्यवाणी ऐकून शिल्पकार घाबरला,,दिवस-रात्र त्याच्या मनात विचार यायचे कि मी आता काय करू?? त्याला युक्ती सुचली, त्या प्रमाणे त्याने हुबे-हूब स्वतः च्या चार प्रतिमा तयार केल्या, अगदी जिवंत वाटाव्या अश्या!!! तो ही त्या मूर्ति च्या बाजू ला जाउन उभा राहिला.
पंधराव्या दिवशी यमदूत शिल्पकाराला न्यायला आला,,पाहतो तर काय,,पाँच शिल्प अगदी सारखे दिसणारे समोर उभे!!! यातला खरा कसा शोधायचा?? तो यमदूत गोधंळला आणि यमराजा कडे गेला,,यमदूतानी सर्व हकीकत सांगितली.
ते ऐकून यमराजा स्वतः मूर्ति पाहायला आले, मूर्ति पाहून यमराजा पण थक्क झाले,त्या कलेची तोंड भरून कौतुक करू लागले, यमराजा म्हणाले, “मूर्ति घडवणारा शिल्पकार आहे तरी कोण?”
अनाहूत पणे शिल्पातले एक शिल्प पुढे सरकत अभिमानाने म्हणाले, “मी ह्या मूर्ति घडवल्या “आणि यमराजांनी तत्काळ शिल्पकाराचा ताबा घेतला,,अहंकाराने शिल्पकाराचा मृत्यू झाला.
जो पर्यंत” मी “आणि “माझ “, मनुष्य स्वभावातुन जात नाही, तो पर्यंत मनुष्या ची प्रगती होत नाही, अहंकारा वर मात करणे सोपी गोष्ट नाही. सर्वप्रथम अहंकार कश्या मुळे आहे, ते समजून घ्यायला हव, उदा:पैसा, बुद्धी, सौंदर्य, सत्ता व इतर काही त्या कारणाच विश्लेषण करायला हव.
जीवन जगण्या साठी माणसाची सर्व धडपड असते, कश्या साठी….आनंद आणि शांति, जर हेच नसेल तर काय अर्थ आहे. इतरांन कडून शिकायला हव आणि अपयश स्वीकारायला हव, मला न आवडलेल्या घटना घडणारच,,समजून घेण आणि क्षमा करता यायला हव.
आपली स्पर्धे ची कल्पना, यशाची कल्पना बदलायला हवी, आपली निकोप स्पर्धा आपल्याशी हवी, इतरांनशी नको. आतंरिक प्रगती साठी, अहंकाराचा त्याग महत्त्वाचा!!! एका कब्रस्तान च्या बाहेर लिहले होते….

*सैकड़ो दफ़न हैं यहाँ…*
*जो सोचते थे कि* *दुनिया….*
*उनके बिना नहीं चल सकती…*