स्थानमः महात्म्य प्रमानमः

0

मृत्यूपूर्वी वडिल आपल्या मुलाला म्हणाले, “माझ्या आजोबांनी मला दिलेले हे *घड्याळ* आहे. हे जवळजवळ *२०० वर्षे जुने* आहे. मी ते तुला देतो, तु *दागिन्यांच्या दुकानात* जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे आणि ते आपल्याला किती ऑफर देतायत ते पहा. “मुलगा दागिन्याचा दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला, आणि म्हणाला, “त्यांनी *१५० रू* ऑफर केले कारण, ते फारच जुने आहे.” वडिल म्हणाले, “आता *भंगाराच्या दुकानात* जा.” मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येवून म्हणाला, “त्यांनी *२० रू* अॉफर केले कारण, ते खूप खराब आहे.”वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन *संग्रहालयात* जायला सांगितलं. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. “बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्याच्या *मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात* समाविष्ट करण्यासाठी *५ लाख* ची ऑफर दिली.” *वडिल शांतपणे स्मितहास्य* करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की *योग्य ठिकाणीच* तुमच *योग्य मूल्य* आहे. स्वतःला *चूकीच्या जागी शोधू* नका आणि तुमचे *मूल्य* नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले *मूल्य* माहित आहे, तेच आपली प्रशंसा करतात.आपली *किंमत जाणून घ्या..* म्हणजे अशा व्यक्ती पासून दुर रहा, ज्याना आपली *किंमत नाही….!* सर्व मित्रांना समर्पित… 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

0