गरज नसतांना..

गरज नसतांना का कोसळावा? पाऊस हा अवकाळी
गरज नसतांना का कोसळाव्या? अश्रूधारा ह्या अवेळी

अश्रू असो वा पाऊस अती झाला की चिखलच होतो
नासधूस पिकांची अन् भावनांचा उद्रेक होतो..

अवकाळी हा पाऊस, होते सर्दी अन् ताप अंगात
अवेळी ह्या अश्रूधारा, होते विचारांची गर्दी संताप अंगात

बळीराजा ‘तोल’ साधून निसर्ग नियमांचे करतो पालन
ते मन, आभाळाएवढे दुःखाश्रू गिळतो रोजच आपण

निसर्गाचा समतोल न साधावा आपण, प्रत्येक कौल मानावा आपलाच,’अवकाळीचे’ ही करावे स्वागत..
मन तसेच किती धरावा धीर आपण भावनांना द्यावी करुन वाट मोकळी, अवेळी अश्रूंचेही गावे नव गीत