तक्रार ( कविता)

कोणाची करावी आणि का करावी तक्रार?
कोणाकडे करावी आणि किती वेळेस करावी तक्रार?

स्वतःचीच स्वतःकडे करावी का तक्रार?
सगळ्यांचीच सगळ्यांकडे करावी तक्रार?

किती किती असतात तक्रारी !
संपता संपत नाही या तक्रारी !

प्रत्येक नात्यात असतात एकमेकांविषयी तक्रारी
छोट्या छोट्या किंवा मोठ मोठ्या असतात तक्रारी

समुहा समुहात आमच्या तुमच्यात गावा गावात शहरा शहरात माणसा माणसात फक्त एकच सूर तक्रार..

स्वभावच झाला आहे आमचा..,
आम्ही काम कमी आणि तक्रारी जास्त,
प्रेम कमी आणि तक्रारी जास्त
विश्वास कमी आणि तक्रारी जास्त

बंद करा जीवनातल्या तक्रारींवर चर्चा
काम करा, प्रेम करा.. हसत खेळत जगत तक्रार शून्य आयुष्य जगा…!!!

कवी – क.दि.रेगे