माझा स्वाभिमान

मी कधीच न विकला माझा स्वाभिमान
मी कधीच न दुखावला कोणाचाच स्वाभिमान

माझे जीवन अन् जपतो मी सदैव माझा स्वाभिमान
ठेच लागता वाहते रक्त, मला माझ्या रक्ताचा अभिमान

गल्ली-बोळात नाही मिरवत मी रिकामी शान
मला माझा, माझ्या अस्तित्वाचाच आहे स्वाभिमान

आज-काल पैसाच झाला आहे प्रत्येकाचा अभिमान
पैशानीच विक्री-खरेदी होतो प्रत्येकाचा स्वाभिमान

जे स्वातंत्र्य म्हणून करतात चाकरी आजही
जे स्वातंत्र्य मिळवून खातात लाचारीची भाकरी आजही

जिथे नाही भेटत मान आणि खाली घालावी लागते मान..
तिथे का कोणी करावी चाकरी? आणि का विकावा पुन्हा पुन्हा स्वाभिमान।

कवी -क.दि.रेगे
नाशिक