ज्ञानसूर्य

ज्ञानसूर्य तू ..

ज्ञानाच्या अथांग आकाशातला ज्ञानसूर्य तू।
ज्ञानाच्या आकाशगंगेत मुक्त विहार करणारा रवी तू।

जनसामान्याच्या आयुष्यातला अविरत ज्ञानप्रकाश वाटणारा भास्कर तू।

स्वतः तळपून मायेची ऊब वाटणारा दलितांचा आदित्य तू।

ज्ञानमहासागरासही तापवणारा तेजस्वी असा मित्र तू।

भारतमातेच्या पारतंत्र्याच्या बेड्या वितळवणारा खग तू।

कठीण परिस्थितीवर मात करून दिन-दलितांना वाट दाखवणारा मरीच तू।

शिक्षणाचा अधिकार मिळवून दिले हे हिरण्यगर्भ तू।

संविधान या भारताचे लिहिणारा हे भानवा तू।

मातेचा या भूमीचा महामानवा सवित्र तू।

महान भारतीय संस्कृतीत रोवला गेलेला अर्काय तू।

एकच परी तू भारतरत्न वंदन तुला करतो हर एक मानव असा पूष्णेः तू।

ही बारा नावे सूर्याची शोभतील तुलाच..

…… असा तू ज्ञानसूर्य
…..असा तू ज्ञानसूर्य

कवी – कपिल रेगे . नाशिक