ओळखा आपल्या शरीराला – आयुर्वेद लेखमाला – डॉ. सचिन आरु

#आरोग्य विशेष
#डॉ आरु लेखमाला
आपले शरीर – ओळख

आरोग्य म्हणजे शरीराची व रोगाविरहित अवस्था. आरोग्य ही साधना आहे. जिचे माध्यम शरीर आहे. आयुर्वेदानुसार शरीर माध्यमाची आवश्यकता असते. यंत्रवत काम करणाऱ्या शरीराची निर्मिती ईश्वराने केली आहे. तर या यंत्रामध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती, उपाय स्वरूप सृष्टीची निर्मिती आहे. सृष्टीतील नैसर्गिक घटक वापरून शरीर यंत्रातील बिघाडाची दुरुस्ती करण्यासाठीच आयुर्वेद या चिकित्सा शास्त्राची निर्मिती झाली आहे.
स्वउत्पत्तीच्या कारणाचे ज्ञान म्हणजे मोक्ष होय. तर मग मानवाला शरीर यंत्राची माहिती असणे म्हणजे रोग मोक्ष असे आपण म्हणू शकतो. आपल्या दुचाकीची दुरुस्ती फिटर करून देऊ शकतात परंतु ती पुन्हा बिघडू नये यासाठी चालकानेच यंत्राची माहिती करून तिची व्यवस्थित देखभाल करने जरुरीचे आहे. रोग होऊ नये यासाठी शरीराचे स्वरूप, रोगांची कारणे व रोगाचे स्वरूप यांची माहिती जरी मिळाली तरी पुष्कळदा प्रमाणात रोग आटोक्यात येतात. मलेरिया, पोलीयो, एड्स यासारखे रोग उदाहरणा दाखल देता येतील. त्याच्या स्वरूपाची माहिती असणे हाच रोग न होण्याचा उपाय आहे. त्यामुळे प्रथम शरीराची माहिती असणे आवश्यक आहे.
आयुर्वेद सृष्टी उत्पत्ती नियमानुसार शरीर हे पाच भौतिक घटकांनी मिळून बनलेले आहे. सृृष्टी निर्मितीसाठी ज्या पाच भौतिक घटकांचे एकत्रीकरण झाले आहे त्याच पाच महाभुतानी शरीराची निर्मिती झाली आहे. सृष्टीतील सर्व मानवी शरीराची उत्पन्नाचे कारण एकच असताना जी विविधता सापडते ती का? काहीजण पावसात भिजतात मात्र नंतर सर्वांनाच सर्दीचा त्रास झाला असे दिसून येते नाही का? एखाद्या व्यक्तीस चहा पिल्यावर उत्साह वाटतो तर दुसऱ्या व्यक्तीस कदाचित डोकेदुखी निर्माण होते असे का? तर याचे उत्तर आहे पंचभौतिक जडणघडणीत पृथ्वी, आग,तेज, वायू व आकाश या पंचमहाभुताचा कमी – आधिकपणा. याप्रमाणे वायू प्राधान्याने निर्माण झालेल्या वात दोषाच्या शरीर प्रकृतीमध्ये गडबडीत जेवण करणारे, जलद हालचाली करणारे, आरंभशूर, अती उत्साही, कमी झोप घेणारे, अंगावर शिरा उठून दिसणारे, दमा, संधीवात, उच्च रक्तदाब, इत्यादी त्रास असणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. तेज महाभूत प्राधान्याने पित्त प्रवृत्त्तीच्या शरीरात दिसून येतो. चटकन रागावणारे, हेवेदावे करणारे, अंगावर जास्त प्रमाणात तीळ असणारे, रक्ताचे, त्वचेचे विकार जास्त असणारे इ. लक्षणे यामधे अधिक पाहावयास मिळतात. त्याचप्रमाणे जल महाभूत प्राधान्य शुत्मीक प्रकृतीच्या शरीरात स्तुल शरीर, मंद हालचाली डौलदार चाल, गोरा वर्ण, परोपकारी वृत्त्तीचे, शरीरावर गाठी असणारे इ. लक्षणे दिसतात.पित्त प्रधान व्यक्तीला न बघता तुमच्या शरीरावर तीळ पुष्कळ प्रमाणात आहे का हो? असे विचारले तरी तो आश्चर्यचकीत होतो. परंतु जादुगार जशी जादू करतो व प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करतो परंतु विचारांती समजते की ही शस्त्र शुद्ध प्रक्रिया आहे. व पुष्कळ अभ्यासाने ती साध्य होते. त्याप्रमाणे स्वतःच्या प्रकृतीच्या लक्षणांचा विचार करून पुढे निर्माण होणाऱ्या रोगाचा अंदाज बांधता येऊ शकतो व रोगाला प्रतिबंध करू शकतो. मग होणार का स्वतःच स्वतःहाचे डॉक्टर!

डॉ. सचिन आरु (MD AYURVED)
9923099006

श्री आर्या आयुर्वेद चिकित्सालय, हडपसर, पुणे

श्री आरोग्यधाम कृषी आरोग्य पर्यटन केंद्र, थेऊर, पुणे

https://youtu.be/xc3MnzZv1us https://youtu.be/2F-UmQqaPbQ https://youtu.be/mTk-binGlcQ https://youtu.be/RimxTziKun0…

Posted by Shree arogaydham on Wednesday, 25 September 2019

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3824771620871058&id=100000147748155

धन्यवाद 😊🙏

3 प्रतिक्रिया