आठवणीतील केळीचे पान..!

आठवणीतील केळीचे पानं..!

तो काळ किती वेगळा होता,जेव्हा आपल्या घरच्या कार्यक्रमाला किती लोक जेवायला आलेत यापेक्षा किती लोक वाढायला आलेत यातून माणसाची श्रीमंती समजायची..
काळ थोडा वेगळा होता…पण आताच्या श्रीमंतीला लाजवेल असा होता.‌.!

सकाळच्या प्रहरीला,मुराळी सर्व गाव फिरून आमंत्रण द्यायचा,बाराला टाळी..एक ला जेवण बरकां..पारावर चर्चा व्हायची..दादा तुमच्याकडे..भाऊ तुमच्याकडे सगळी कडेच आमंत्रण..आणि एखाद्या ठिकाणी मुराळी काका आमंत्रण द्यायला विसरले..तरी प्रेमाच्या भावनेने म्हणायचे..घाई-घाईत विसरले असतील..आपलचं प्रेमाचं माणुस हायं..!
कसलं आमंत्रण..चल येतो की जेवायला..
त्या केळीच्या पानावर भोजनाची मजाचं काही वेगळी होती.सर्वप्रथम विचार व्हायचा..अरे गणा केळीची पानं कुठं रे मिळतील..गणा पटकन म्हणायचा..अरं त्या रामा आण्णांच्या मळ्यात..गण्या पटकन जायचा अन् पानं पटकन घेऊन घ्यायचा..जमलेली मित्र-मंडळी पानं आलेत की देठ कापुन पानं तयार करून ठेवायची..दुसऱ्या दिवसाला सर्वच मंडळी पट-पट पानं टाकून मोकळी व्हायची..एकत्र पंक्तीचा जोर धरायची.पानावरची ती वाग्यांची भाजी,आणि वरण भाताची मजाचं काही वेगळी होती..वरण पानं सोडून पळून नये म्हणून सगळ्यात पहिले तो भाताचा बांध.. व वाग्यांची भाजी पानाच्या खाली जाऊ नये..म्हणून हाताने धरून ठेवलेले पान..या सर्वांची युती करून मस्त हाऱ्य मैफीलीच्या आनंदात भोजनाचा आस्वाद घेण्याचा आनंदच फारसा वेगळा होता. पंचतारांकीत हाॅटेल पेक्षा‌..हे माझ्या गल्लीतील भोजन भारी होतंं..
याची सर आताच्या गुलाबजाम,रस मलाईत पण येत नाही…
ती एक वेगळीच आनंदाची पंगत होती..विसाव्याची दुपार होती..आता ही मन त्या युतीच्या आठवणींनी व्याकूळ होतं.. केळीच्या पानावरचे अनेक आयुर्वेदीक फायदे होते.अन् त्या पानांच्या स्पर्शात एक वेगळा गारवा होता.जो पूर्णपणे निसर्गाचा आणि गरिबीचा पक्का मित्र होता.वापरून टाकून दिल्यावर ही त्याच्या उरलेल्या अन्नामुळे बरीचं गुरं… केळीच्या पाना सकट सगळं ग्रहण करायची..पण कधीच कुठलाही त्रास त्या मुक्या जनावरांना झाला नाही.
उपवासाचे जेवण असो किंवा नैवेद्य दाखवायचा असो..तो केळीच्या पानावरचं दाखवला जायचां..पूर्वी घरोघरी परसदारी केळीचे बन असायचे.लग्नादी शुभकार्यात केळीच्या पानाचे खुप महत्व असायचे.काही अन्नपदार्थ शिजवतांना भाड्यांच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पध्दत होती..ज्यामुळे अन्न-पदार्थाला मंद सुवास यायचा.केळीची झाडं शोधण्याचा प्रघात असायचा..
काळ बदलला.. केळीच्या पानांची जागा प्लाटिक ने घेतली.प्लास्टिकने अक्षरक्ष;
सर्वांना वेडे लावले..
वेळेचा शाॅटकर्ट सापडला..पण खुप मोठ्या आजाराला आमंत्रण दिलं.
गेल्या काही महिन्यात प्लास्टिकला बंदी आली.पण जनतेने त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही.
पण आता आपले काम आहे..जुन्या-रूढी परंपरांना साद घालण्याचे व उजाळा देण्याचे..अनं द्रोण-पत्रावळ्या प्लास्टिक न वापरता केळीचे पान वापरायचे.त्या मुळे परत निसर्गाचे संवर्धन वाढेल.
शेता-शेतात केळी-माय आनंदाने डोलू लागेल. केळीचं पानं विकणं हे एक चांगल उदरनिर्वाहचं साधन होऊ शकेल..आणि प्रत्येकाच्या घरात एक आनंदाचा भात शिजेल.

आकाश दिपक महालपूरे
मु.पो.गोंदेगाव ता.सोयगाव जि.औ.बाद.
मो.नं..7588397772