तुझ्या या निसर्ग मित्राला

आणि अवकाळीचे सत्य उलगडले
सृष्टीचे नव-नवीन खेळ पुन्हा चालू झाले
गारपीटीने डाव साधून बळीराजाला नाचवले
अरे मानवा तुज पुन्हा एकदा पावसाने या धोबीपछाडले

तुझीया बुद्धी चातुर्याने तू नव विश्व निर्मिले
ज्ञान-विज्ञान वापरून तू एक युद्धच पेटवले
निसर्गाच्या नासधूसीस तू तुझे विजय मिरविले
पंचतत्वावर स्वार होऊनी तू स्वतःला गर्वात बुडविले

आज वेळ आली मानवा सावर तू स्वतःला
युद्ध तुझे तू थांबून आवर घाल तू स्वतःला
तुझ्या भविष्याचा साथी मान तू निसर्गाला
अन् दे मैत्रीचा हात सदैव तुझ्या या निसर्ग मित्राला।
…………………………….तुझ्या या निसर्ग मित्राला।