बहारोकी मंजिल…

कही तो मिलेगी कभी तो मिलेगी बहारों की मंजिल..
नैराश्याचें ढग सातत्यानें मनाच्या प्रांगणात विहरत असतात.नैराष्य आलं की माणसाला अध्यात्मिक व्हांव वाटतं, अंधश्रद्ध व्हांव वाटतं, ती त्याची त्यावेळेची भावनिक गरज असते. कर्मकांड ही एक दलदल आहे त्यात न गुंतणं हे एक कौशल्य आहे. कुणाच्या तरी तत्त्वज्ञानानें, कुणाच्या तरी विचारानें, कुणाच्या तरी मानस शास्त्रानें माणसे तग धरतात.
विचार ढगां प्रमाणे येतात व ढगां प्रमाणेंच जातांत. काही काळ्याकुट्ट ढगा प्रमाणेंच मनांत घर करतात. काही बरसतांत, मन मोकळं करतातं. झालें मोकळे आकाश ची भावना देतात.
फिटे अंधाराचे जाळे याची जाणीव करून देतात.
माणसाला सतत सुखांच्या रसायनांचा शोध घ्यावा वाटतों. सुखाची लस त्याला टोचून घ्यावी वाटतें. व्यर्थ चिंता नको असे वाटतें पण ती वाटतेंच. आपलं वाटणं आपल्या हातात कुठे असते?
नैराश्य टाळता येत नाही, पण घालवतां येतं, कमी करता येतं,त्याची तिव्रतां कमी करता येते. तिव्रतां सुसह्य झाली की सगळंच सुसह्य होतं. आपल्या हातात फक्त वाट पाहणं असतं. संहिता आधीच तयार असतें, चित्रपट ही तयार असतों,पाहणें आणि त्याचे निरीक्षण, रसग्रहण करणे एवढेच आपल्या हातात असतं.
न संपणारे अस्थैर्य कुणालाच नको असते. प्रत्येकाला वाटतं वों सुबह कभी तो आऐगी ,वो बहारें कभी तो आऐगी. माणसं आशेंवरच जगतात. जगायलाही हवं, नाहीतरी जगण्यासारखंआहे तरी काय?
बदल जायें अगर मौसम बहांरें फिर भी आयेगी आशावाद ठेवलांच पाहिजे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू देआभाळांगत माया तुझी आम्हांवर राहू देंहा हां आशावादच जगवतों.
सगळं संपलं असं वाटत असतांना गरुड भरारींचं बळ येतं.
थोड्याच दिवसांचे सोबती म्हणून शिक्कामोर्तब झालेलें जगण्याचें प्रमाणपत्र देऊ लागली.
किडनी गेली तरी आशेची किडनीं असतें.
किडनी गेली
तरीही इतरांचे डोळे फुलवतां येतांत. स्वतः निराश असलं तरीही धीर देतांच येतो. सगळं काही चांगलं होईल एवढं तर म्हणतांच येतं. कुणीतरी प्रेरणा दिलेलीअसते म्हणूनंच आयुष्य
वाहतं राहतं. कुणीतरी सुप्त गुण ओळखून भविष्य सांगितलेलं असतं. भविष्य वाचून काही होत नाही, भविष्य घडवूनंच सगळं होतं. व्यवस्थेने अस्तित्वाची दखल घेईपर्यंत आशावाद जपलांच पाहिजे. व्यवस्था सगळ्यांनाच नाकारतें
. काहीच नसणाऱ्यां नी इतिहास घडविलें आहेत.
शरीराचं थकणं आपल्या हातात नाही, मनचं गाणं तर आपल्याच हातात आहे.
ताण, हलकें व्हायचें प्रसंग शोधले पाहिजेत, माणसें शोधली पाहिजेत. अपेक्षा नसतांना कुठेतरी, कुणीतरी,काहीतरी केलंल असतं म्हणूनच आपल्या जीवनात आनंद असतो, बहार असतें..
नगण्य अस्तित्व असणाऱ्यांनी आधी अस्तित्व निर्माण केलं आणि अनेकांना अस्तित्व दिलं. आशावादाने एक पिढी पोसलीं जातें, बहरतें ,उमलतें. वास्तवाच्या पायऱ्या चढल्या शिवाय यशोशिखर दिसंतच नाही. कुणीतरी निमीत्त असतंआपल्या जगण्याला, आनंदाला कधीकधीं आशावादही निमित्त असतं. नैराश्य आलं की कपारीतून इवल्याशा रोपट्याचा डोकांवणारां आशावाद पहावां. दवबिंदूचंअस्तित्व न्याहळावं. माणस घडायलाां निमित्त लागतं. पत्रातूनही भावनिक पोषण घडतं.अनुवंशिकतेंचें झरें असतांतच,वेळेवरंच तें पाझरतांत.
झऱ्यांना वाहतं ठेवायचं असेल तर कर्तृत्व आवश्यकच.झरे दडलेले असतात, त्यांना मोकळं करावं लागतं. सगळ्यांना कुठे आधार मिळतों, पण आधारवड तर होता येतं. गाणं कुठून येतं व आनंद कुठून येतो बहार कुठून येते कळत नाही पण येतें. चकोर झालं की चंद्रकोर आपलीच असतें.एक दिवस असां येतों सारा चेहरामोहरा बदलून जातों, यावर विश्वास ठेवायला हवा. आपल्यातला सुप्तावस्थां, क्षमतां आपल्यालांच माहित नसतातं. प्रार्थनेने माणसें बरी होतात, आशीर्वादाने मोठी होतांत. कुठून तरी काहीतरी चैतन्य येतंच जे लपलेलं असतं. आसमंत भारावून टाकणारं असं काहीतरी असतंच. दैवी शक्ती कशी आकलनां बाहेरची असतें? प्रेम दिसत नसलं तरीही असतंच. पुष्कळ गोष्टी आहेत हे धरून चाललं की
आधार असतोच. वो सुबह कभी तो आएगी याच्यावर विश्वास हवां. कुणी काय दिलें हें आकाशातले तारें मोजण्या सारखेंआहे. नक्षत्राचं देणं हा फक्त अनुभवायचं. शरदाच्या चांदण्यात फक्त न्हाऊन निघायचं. आपल्या वाट्याला आलेले क्षणंच इतके क्षणिक असतांत मनाच्या अंगणात फक्त क्षणांची रांगोळी काढणे आणि त्यात रंग भरणे हेंच आपल्या हातांत आहे आहे. प्रत्येक क्षणांना आपण कसें रंगवतो, यावर आपल्यां आयुष्याचा इंद्रधनुष्य अवतरतों. आपलें क्षण केवळ आपलेंच असतांत असें नव्हें, ते दुसऱ्यांच्येंही असतात. दुसऱ्यांनी फुलंत रहायचं म्हणूनन आपण फुलंत राहायचं. काही अनुवंशिकतेची रानफुलें दुर्लक्षिलीं गेली, काही सुकलीं,
तरीही प्राजक्ता प्रमाणें दुसऱ्याचं अंगण बहरतां आलं पाहिजे.
सकाळी सृष्टीचे चैतन्यं तुम्हाला जागवायलां येतं, उठवायला येतं आपणंच झोपलों तर येतं तसं जातं. आनंदाच्या ही वेळां सांभाळायला हव्यांत. श्वासांची सगळी धडपड अखेरच्या श्वासांपर्यंत सांभाळायलांच हवी.
डॉ.अनिल कुलकर्णी.

मन

वडील..