लपंडाव त्या रवी मेघाचा।
हा खेळ अनोखा सृष्टीचा ।
कधी किरणांचा कधी मेघांचा।
सुखद आनंद दृष्टीचा ।
भेदू आपण मेघांना,
अट्टाहास त्या किरणांचा ।
थोपवून त्या रवी किरणांना,
विश्वास वाफेच्या मेघांचा ।
बघणाऱ्या त्या डोळ्यांना,
स्पर्श थंड वाऱ्याचा।
खेळ नसतो हा पराभवाचा किंवा जिंकण्याचा ।
खेळ आहे हा रवी मेघाच्या प्रेमाचा।
या प्रेम-मिलन खेळातून जन्म होतो पावसाचा।
धडा घ्यावा आपण या सृष्टीकडून,
फक्त आणि फक्त प्रेमाचा।
कवी- क.दि.रेगे
नाशिक..