प्रिय जॉर्ज प्लॉइड
माणसापेक्षा मेंढर बरी.
तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा.तुझ्या जाण्याने ही गाणी प्रकर्षाने आठवत आहेत.
इन्सान की औलाद ने इन्सानियत कबकी छोडी है.
I cannot breathe म्हणणाऱ्याला नऊ मिनिटात त्याचा श्वास जाईपर्यंत गुदमरून मारण्यात येतं. गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अनंनस खायला दिलं जातं. अत्याचार सार्वत्रिक झाला की त्याचा वणवा होतो. अनेक अत्याचार घडतात हे ज्याची चर्चा होते तोच अत्याचार समजला जातो. भयानक क्रूर घटना समाजात आधुनिक मोबाईल च्या टिप कागदाने टिपता येतात व व्हयरल करता येतात. जे व्हायरल होतं, त्याची चर्चा होते,त्याच्यावर बुद्धिवंत चर्चा करतात,
सेमिनार वेबीनार होतात, संशोधन पेपर सादर केले जातात,अनेकांना डॉक्टरेट पदवीमिळते. विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या
कपाटात धूळ खायला अजून एक ग्रंथ कपाटात जाऊन बसतो.
जे जेआज व्हायरल होतं तेवढंच आयुष्य दिसतं. सगळ्यांना हिमनगाचं टोकच पाहायचंय. कारण ते पाहायला सुखद असतं.
लोकांना सुखाची टुलिप गार्डन पाहायला आवडते. डम्पिंग कचरा ग्राउंड कुणाला चआपल्या सभोवताली नको असतो.
इन्सान की औलाद यंत्रमानव बनत आहे,भावनाशून्य. मृत्यूचं लाईव्ह रेकॉर्डिंग करून ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदाच, आपण कशी दिली याच श्रेय घेण्याची स्पर्धा लागली आहे.
प्रत्येक न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून दिली जात आहे.
शरीर धडधाकट असताना मृत्यूने आपल्या उरावर बसून आपला प्राण घेणे क्लेशदायकच.
तू ओरडून ओरडून सांगत होता, श्वास घेऊ शकत नाही माझ्या मानेवर गुढगा काढा, मी मरत आहे, मला वाचवा अस असताना सुद्धा पाहणारे ओरडत, चित्रीकरण करत होते. परंतु त्याच चित्रीकरणामुळे जगासमोर तुझा याची देही याची डोळा लाईव्ह मृत्यू पाहिला आणि सगळे पेटून उठले. रंग माणसाच्या जीवनात रंग भरतात माहीत होतं, पण माणसाला उद्ध्वस्त करतात, तसं अनेक वर्षापासून हे पाहतोय.आपल्या आयुष्याचा शेवट कसा आणि कधी होईल हे कुणालाच सांगता येत नाही. ‘नरे ची केला हीन किती नर’ आमच्याकडे म्हणले जाते पण एखाद्याचा गुन्हा असेल तरी त्याच्यासाठी कोर्ट आहे. पाशवी अत्याचार होतो तेव्हा माणसे हतबल होतात. मानेवरचा गुडघा नऊ मिनिट काढलाच नाही, मानेवर दाबून ठेवला आणि श्वास घेता आला नाही. श्वास घ्यायला सुद्धा जेव्हा परवानगी लागते तेव्हा जगणं अवघड होऊन जातं. श्वास म्हणजे जीवन. सगळं संपलं असतानाअखेरचा श्वास जीवनाचे The end करतो. आमच्याकडे हिंदू साधूंना बेदम मारलं त्यांनी असाच प्राण सोडला.
आजकाल माणसं मदत करत नाहीत, चित्रीकरण करतात. साधूंना वाचवता आला असतं त्यासाठीच पोलीस असतात पण पोलीस आणि जनसमुदाय असतानाही तुझा मृत्यू होतो.
श्वापद सगळीकडेच आहेत नवनवीन तंत्र शोधण्यात माणसांचा हात कोणी धरणार नाही विषाणूचा प्रसार यापेक्षाही त्यांचा प्रसार झपाट्याने होतो.
गुडघ्याने मान दाबत श्वासच चिरडून टाकायचा हे तुमच्या कडे घडले, फटाक्याने भरलेले अननस खायला देणे हे आमच्याकडे घडले. तसं त्रासदायक प्राण्यांना आपण संपवतोच. उंदीर मारताना उंदराची पिल्ले ही मरतात. अनेक हत्या, आत्महत्या यांची दखल घेतली जात नाही. जे दिसतं तेच सत्य. जे viral होतं तेच आणि तेवढेच सत्य. उपद्रव न करणाऱ्या ची हत्या केली की आपल्याला हळहळ वाटतेच. लोक मृत्यू ला जवळ करतात किंवा मृत्यू माणसाला जवळ करतो.
जगायचं कुणी याचा न्यायनिवाडा माणसेंच करत आहेत. प्रत्येक व्यक्ती न्यायालय आहे व स्वतः न्याय-निवाडा देत आहे.
समाधी पूर्वी स्वेच्छेने घेतली जायची आज ती जबरदस्तीने घ्यायला लावली जात आहे.
I cannot breathe म्हणून कुणाला समाधी घ्यावी लागते तर कुणाला पाण्यात तोंड बुडवून जलसमाधी घ्यावी लागते. दवाखान्यात
वास्तव इतकं भयानक आहे की मृत्यूच्या बाहुपाशात जावं लागतं किंवा जावं वाटतं. बेडवर निष्प्राण पडून सलाईन च्या नळ्याकडे पाहण्यापेक्षा घरी जीव सोडलेला अनेकांना आवडतो. आपला मृत्यू आपल्या अंगणातच व्हावा आपल्या आकाशातच व्हावा असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाचा आंगण, आकाश अवकाश ठरलेलं असतं. No tomorrow please असं म्हणत प्राण सोडलेले मी पाहिले आहे. खाण्यासाठी डुकराच्या पिल्लाला बुक्याने मारून टाकणारे, सापाची शेपटी पकडून त्याला जमिनीवर आपटून नंतर भाजून त्याला खाणारे हेही पाहिलं आहे. गळा चिरून मारणे, बलात्कार करून मारणे,उंदीर मारताना तिच्या पोटातही उंदराचे पिल्लू असतं. पणते व्हायरल होत नाही. जेवढा वाटा तेवढया पळवाटा आधीच तयार असतात.दृष्टीआड सृष्टी प्रत्येकालाच आवडते.
संघर्ष जेव्हा दुबळा पडतो तेव्हा अमानवीय शक्तीचा विजय होतो.
ज्याचं त्याचं जीवन म्हणजे ज्याचा त्याचा संघर्षच असतो.
कुणी संघर्षावर स्वार होतो तर कुणाला संघर्षांपुढे हार मानावी लागते. Survival of the fittest हेच जगण्याचं सूत्र आहे. असहाय्य परिस्थितीत , नैराश्याच्या गर्तेत शरीराचा आणि मनाचा दुबळेपणा जेव्हा हातात हात घालून मृत्यूच्या स्वाधिन होतो, तोच अखेरचा श्वास असतो. मनापुढे शेवटी शरीर लुळपांगळ होतं. निसर्गात वर्णद्वेष नाही पण मनात वर्णद्वेष आहे. मनाचा प्रत्येक सेकंद वेगळ्या रंगात रंगलेला असतो. एखाद्या सेकंदात तो आत्महत्या करतो, हत्या करतो, जीवदान देतो, मन दुखावतो, मन प्रसन्न करतो. हे सगळे अनाकलनीय आहे.तू देश पेटवले,मनें पेटवली.
चित्रपट चालू असताना आपण फक्त प्रेक्षक असतो.नंतर फक्त समीक्षा आपल्या हातात असते.
डॉ.अनिल कुलकर्णी.