संघर्ष
संघर्षाविना अशक्य स्वप्नपुर्ती,
संघर्षाविना न कोणाचा उत्कर्ष
संघर्षानेच चकाकते पाषाण मुर्ती
संघर्षानेच पसरते दाही दिशा किर्ती
अविभाज्य घटक असतो संघर्ष
प्रत्येकाचा सोबती असतो संघर्ष
न घडला इतिहास संघर्षाविना
न सुकर होतो वर्तमान संघर्षाविना
‘अविरत कर्म’ओळख संघर्षाची
‘विजयाची सवय’ओळख संघर्षाची
संघर्षाविना ‘न’ जगतो सजीव कोणताच या जगती
संघर्षाविना ‘न’ चाखतो रसाळ फळ कोणी या जगती
जन्म एक संघर्ष, जगणे एक संघर्ष
मृत्युला करावा लागतो जगण्यावर विजयासाठी संघर्ष