‘ती’ सध्या कुठे मिळेल?
कोरोना च्या महामारीचा मानवी जीवनावर खुप वाईट परिणाम होत आहे. एकमेकांशी भेटणे दुरापास्त झाले आहे. यावर इलाज म्हणून सरकार व संशोधकांनी कोरोना लस बाजारात आणली व वयोमानानुसार ती घेण्याचे आवाहन केले परंतु आपल्या देशाची लोकसंख्या इतकी प्रचंड आहे की इतक्या प्रमाणात लस कधीपर्यंत उपलब्ध होईल हा मोठा प्रश्न आहे. सरकारी पोर्टल वर नोंदणी करून लस मिळू शकेल असे जरी सरकारने जाहीर केले असले तरी मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्यामुळे कित्येक लसीकरण केंद्र बंद आहेत.
अगदी खोलवर विचार केला तर आपणास नक्की जाणवेल की आपण या सर्व गोष्टींना कारणीभूत आहोत, कोणतेही सरकार किंवा संस्था इतक्या मोठ्या लोकसंख्येला किती वेळांत लस उपलब्ध करेल हे अधांतरी आहेच शिवाय देशातील पक्षीय राजकारणात लोकांना किती त्रास मिळतोय हा वेगळाच मुद्दा आहे, केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतला की राज्य सरकारे त्याचा अभ्यास न करताच त्यावर उलट प्रतिक्रिया देऊन मोकळी होतात याचे एखादे उदाहरण पाहिल्यास, केंद्र सरकारने कोरोनाच्या उतरत्या काळात म्हणजे च डिसेंबर जानेवारी मध्ये लसीकरण करण्यावर भर दिला होता, त्याला विरोधी पक्षांच्या सरकारने नेत्यांनी धादांत खोटारडे पणा ठरवून लोकांची दिशाभूल केली व आत्ता तेच लोक लसीकरण का वाढवले नाही याचा बोभाटा करत आहेत. यांच्या उंदीर मांजरांच्या राजकारणात कित्येक लोकांचा निष्पाप बळी गेला. मध्यंतरी आॅक्सिजन ची फार तुटवडा भासू लागला यावरून सुद्धा राजकारण चालू झाले, स्वातंत्र्यानंतर कितीतरी प्रमाणात सर्वसामान्य लोकांना प्राथमिक सुविधा मिळत नाही मग अचानक एखादी गोष्ट प्रसार माध्यमांतून प्रकाशित होते नंतर बोलघेवडे नेते ती गोष्ट आम्ही जनतेला मोफत देऊ असे बोलुन जनतेतुन वाहवा मिळवतात, नक्की एखाद्या गोष्टीचा तुटवडा निर्माण होतो आणि समाजात गैरसमज पसरतात, जास्तीत जास्त लोक ती वस्तू आपल्याजवळ साठवून ठेवतात, चढ्या किंमतीने विकतात, आॅक्सिजन बाबतीत आपण पाहिलेच. एक सत्य घटना आपण पाहिली तर चार-पाच वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातुन एक बातमी पसरली गेली की, देशातील मिठाचा साठा संपत असुन ते आता चारशे रूपये किलो इतके होत आहे, ही बातमी देशभर पसरली, मग काय लोकांनी मीठ खरेदीसाठी गर्दी केली. अनेकांनी शंभरीच्या घरात मीठ खरेदी केले, परंतु नंतर सरकारला सांगावे लागले, ही अफवा आहे, यावरून समाज तुटवडा असलेल्या वस्तू साठी व ती मिळवण्यासाठी किती धडपडतो हे समजते, असेच बहुधा कोरोनाच्या लसीकरण साठी होत आहे.
इस्रायल सारख्या लहान परंतु बलाढ्य देशाने लसीकरण पूर्ण करून कोरोनाचे सारे निर्बंध हटवले आहेत. न्यूझीलंड, अमेरिका इतर ही काही देश यांत येतील. या देशांची लोकसंख्या कमी असल्यामुळे हे करू शकले, एक वाक्यप्रयोग आहे, लहान कुटुंब सुखी कुटुंब. भारतात लोकसंख्या वाढ हा वेगळाच मुद्दा आहे, २०२३ च्या मध्यावधीत चीन ला मागे टाकून भारत जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असो.
कोरोना मुळे लोक लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु साठा कमी असल्याने दिवस लांबत आहेत, अनेकांना पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोस ची वाट पाहत आहेत. सरकारी यंत्रणा पहिला आणि दुसरा डोस यामधील कालावधी वाढवत आहेत, शक्यतो लसी वाढवण्यासाठी हा प्रयत्न असावा. देशात सध्या ‘सीरम संस्था ‘ ही कोरोनाच्या लसी उत्पादनात अग्रगण्य आहे, तिच्यावर ही प्रचंड ताण आहे, नुकतेच त्यांच्या प्रमुखांनी(Vaccine man) सांगितले की, इतक्या प्रचंड लोकसंख्येला कमी कालावधीत लस उपलब्ध करून देणे अशक्य आहे. सध्या तरी ते देशातील शक्तिशाली लोकांच्या सुचीत येतात परंतु त्यांनाही दबाव व धमक्या मिळू लागल्या, कोण असावे हे अजून गुलदस्त्यात आहे, तेही सध्या युरोपात बस्तान मांडून तिकडे व्यवसाय वृद्धी करू पाहत आहेत. देशातील लसीचे उत्पादन ही मुबलक प्रमाणात करत आहेत. सरकारी आकड्यांनुसार १८ करोड पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले असले तरी बरीच संख्या अजुन बाकी आहे.
लसीकरण करून सुद्धा काहींना कोरोना होत आहे, परंतु धोका फार कमी आहे, त्यामुळे जेव्हा कधी लस उपलब्ध होईल तेव्हा ती नक्कीच घेतली पाहिजे. कोरोनीचे दुरगामी परिणाम समाजावर होणार आहेत, अनेकांनी नोकरी व्यवसाय गमावले आहेत, शिक्षणाचा पुरता बोजारा उडाला आहे. अनेक तरूणांना करिअर चे भवितव्य धोक्यात वाटते आहे. यांतून सावरायला हवे. कोरोना ही महामारी जरी संपूर्ण जगभर असली तरी तिला कवटाळून बसणे सोयीचे नाही, नाहीतर नैराश्याच्या गर्तेत अनेकजण जातील. जनजीवन सामान्य व्हायला नक्कीच वेळ लागणार आहे. लसीकरणावर किंवा कोरोनाच्या दुष्परिणामावर मुद्देसूद लिहायला जमायचे नाही कारण हल्ली रोज नवीनच काहीतरी पहायला वाचायला मिळतेय. आतातर अजून काही काळी बुरशी, सफेद बुरशी रोग आलेत तेही महामारी च्या रूपाने, म्हणून मग आता “वेळेलाच सर्वशक्तिमान” मानून आपण स्वतः ची व इतरांची काळजी घेतली पाहिजे.
मुळ विषय, ‘ती’ म्हणजेच कोरोनाची लस ही लसीकरण केंद्रावरच मिळू शकेल, सरकारने धोरण ठरवले तर घरोघरी मिळू शकेल किंवा खाजगी रूग्णालयात परंतु तोपर्यंत तारतम्य बाळगत वाट पहावी लागेल.